बारबाडोस ते दिल्ली 16 तासांच्या प्रवासात टीम इंडियाच्या खेळाडूंनी काय काय केले, वाचा पूर्ण डिटेल
बाराबाडोस ते दिल्ली हे विमान खूप लांब होता. स्थानिक वेळेनुसार भारतीय संघाला घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान बाराबाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथून पहाटे 4.50 वाजता निघाले. 16 तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचला.
टी 20 विश्वचषक 2024 स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकवल्यानंतर 5 दिवसांनी भारतीय संघ मायदेशी परत आला. त्यानंतर भारतीय चाहते आणि टीम इंडियाचे खेळाडू जल्लोषात बुडाले आहे. टीम इंडियाचे खेळाडू वेस्ट इंडिजमधील बारबाडोस येथील चक्रीवादळात अडकले होते. चक्रीवादळामुळे सर्वच विमाने बंद होती. विमानतळावरील सर्व ऑपरेशन थांबवण्यात आले होते. विमानतळच बंद असल्याने उड्डाणे सुरू नव्हती. चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर आता भारतीय संघ एअर इंडियाच्या विशेष विमानाने नवी दिल्लीत परतला आहे. सुमारे 16 तासांच्या प्रवासानंतर ब्रिजटाऊन, बाराबाडोस येथून भारतीय संघ दिल्लीला आला.
16 तासांचा प्रवाशात काय केले
बाराबाडोस ते दिल्ली हे विमान खूप लांब होता. स्थानिक वेळेनुसार भारतीय संघाला घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान बाराबाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथून पहाटे 4.50 वाजता निघाले. 16 तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचला. हा प्रवास 16 तासांचा असतानाही भारतीय संघातील खेळाडू थकले नाही. 16 तासांच्या या प्रवासात जल्लोष करत राहिले. फ्लाइटमध्ये खूप आनंद साजरा केला.
Travelling with the prestigious 🏆 on the way back home! 😍
🎥 WATCH: #TeamIndia were in excellent company during their memorable travel day ✈️👌 – By @RajalArora #T20WorldCup pic.twitter.com/0ivb9m9Zp1
— BCCI (@BCCI) July 4, 2024
बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर
बीसीसीआयने विमान प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा ट्रॉफीसोबत पोज देताना मस्ती करत आहे. सर्व खेळाडू ट्रॉफीसोबत एक एक करून फोटो काढत होते. रोहित शर्मानंतर विराट कोहली, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराजसह जवळपास सर्वच खेळाडू यात सहभागी झाले होते. यासोबत सर्वांनी एकमेकांच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिले. खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीयही या विमानात होते.
It's home 🏆 #TeamIndia pic.twitter.com/bduGveUuDF
— BCCI (@BCCI) July 4, 2024
भारतीय संघातील सर्व खेळाडू विमानातही आनंद साजरा करत होते. चषक जिंकल्यानंतर पाच दिवसांनी खेळाडू भारतात परतत आहे. त्यानंतर त्यांचा जल्लोष कमी झाला नाही. दिल्लीत पोहचल्यानंतर चाहत्यांनी जल्लोष सुरु केला. संपूर्ण संघ त्यांच्या जल्लोषात सहभागी झाला. आता खरा जल्लोष मुंबईत संघ पोहचल्यावर होणार आहे. मुंबईतील नरीमन पाईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दिल्लीत आल्यावर टीम इंडियाचा कार्यक्रम असा
- 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
- 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
- 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
- 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
- 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
- दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
- 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
- 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
- 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
- 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
- 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
- 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान