T 20 World cup: सिलेक्शनपूर्वी टीम इंडियासाठी दोन मोठ्या Good News
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया मागच्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी करतेय.
मुंबई: येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया मागच्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी करतेय. मागच्यावर्षी साखळी फेरीतच टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलं होतं. यावर्षी अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. वर्ल्ड कपपूर्वी झालेली आशिया कप स्पर्धा टीम इंडियासाठी महत्त्वाची होती. टीम इंडियाकडे जेतेपदाच दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. पण सुपर 4 मध्ये टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलं.
म्हणूनच आशिया कपमधील पराभव जास्त सलतो
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचे दोन प्रमुख गोलंदाज खेळले नाहीत. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. टीम इंडियाने आशिया कपमध्ये पहिले दोन सामने जिंकले. पण सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव झाला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपलं. टीम इंडियाचा हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे. कारण पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुलनेत टीम इंडियाचा संघ सरस आहे. टीम इंडियाने मागच्या दोन महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिमध्ये टी 20 मालिका जिंकल्या आहेत. म्हणूनच आशिया कपमधील पराभव जास्त सलतो.
तीन ते चार बदल होऊ शकतात
येत्या 15 किंवा 16 सप्टेंबरला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडली जाणार आहे. या सिलेक्शनकडे सगळ्यांचच लक्ष लागल आहे. जास्तीत जास्त तीन ते चार बदल या टीममध्ये होऊ शकतात. कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा आधी तसे संकेत दिले आहेत. टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी गुड न्यूज आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
निवडीचा मार्ग मोकळा
निश्चितच यामुळे बीसीसीआय आणि सिलेक्शन कमिटीवरचा ताण कमी झाला आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे भारताचे दोन प्रमुख गोलंदाज आहेत. दुखापतीमुळे ते आशिया कप स्पर्धेत खेळू शकले नाहीत. शनिवारी दोघांची NCA मध्ये फिटनेस टेस्ट पार पडली. या दोन्ही प्लेयर्सनी ही फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपसाठी त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय.
डॉक्टर्स प्रगतीवर समाधानी
बुमराह आणि हर्षल पटेलने त्यांचा फिटनेस परत मिळवला आहे. शनिवारी बंगळुरुतीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ही टेस्ट पार पडली. यावेळी बीसीसीआयचा मेडकील स्टाफ उपस्थित होता. ते त्यांच्या प्रगतीवर समाधानी आहेत.