T20 World Cup : आज होऊ शकतं टीम इंडियाच सिलेक्शन, चांगलं खेळूनही पुन्हा एकदा याच प्लेयरवर अन्याय होणार का?
T20 World Cup : आयपीएल दरम्यान T20 वर्ल्ड कप 2024 वर सगळ्यांची नजर आहे. लवकरच त्यासाठी टीम इंडियाच सिलेक्शन होऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार मंगळवारी टीम इंडियाचे सिलेक्टर्स बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतील. त्यानंतर टीम इंडियाची घोषणा होईल.
T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कोण-कोणाला संधी मिळणार? त्याच उत्तर लवकरच मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच सिलेक्शन मंगळवारी होऊ शकतं. टीम कशी असेल? त्याची रुपरेखा आधीपासूनच स्पष्ट आहे. फक्त त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी एक बैठक होईल. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि दुसरे निवडकर्ते बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेणार आहेत. टीमची घोषणा आज म्हणजे मंगळवारी होऊ शकते किंवा उद्या 1 मे रोजी देखील होईल.
टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये दोन मोठे मुद्दे आहेत. दुसरा विकेटकीपर आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या. ऋषभ पंतच सिलेक्शन पक्क मानलं जात आहे. पण दुसऱ्या विकेटकीपरच्या जागेसाठी संजू सॅमसन आणि केएल राहुलमध्ये थेट सामना आहे. रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसनची टीममध्ये निवड कठीण दिसतेय. त्याने आयपीएलमध्ये धावा केल्या आहेत. पण नंबर 3 वर तो फलंदाजी करतो. राहुल सुद्धा आयपीएलमध्ये ओपनिंगला येतो. वेस्ट इंडिजच्या स्लो विकेटवर राहुलच्या अनुभवाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्याचं सिलेक्शन पक्क मानलं जात आहे. असं झाल्यास पुन्हा एकदा चांगलं परफॉर्म करुनही संजू सॅमसनवर अन्याय होऊ शकतो.
अजून कोणाच सिलेक्शन मोठा मुद्दा?
हार्दिक पांड्याच सिलेक्शन सुद्धा मोठा मुद्दा आहे. आयपीएलमध्ये फॉर्मसाठी हार्दिक चाचपडतोय. त्याच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही त्याचा प्रभाव दिसत नाहीय. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या महागडा ठरतोय. त्याचं उपकर्णधारपद सुद्धा धोक्यात आहे. पंतला टीम इंडियाच उपकर्णधार बनवण्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार शिवम दुबेचा सुद्धा टीम इंडियात समावेश होऊ शकतो. आता सिलेक्टर्स आणि बीसीसीआय सचिवांदरम्यान मंगळवारी चर्चा होईल.