Asia cup 2022: वर्ल्ड कपमध्ये लेफ्टी बॅट्समनवर जास्त विश्वास टीम इंडियाला नडणार?
Asia cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडियाला अपेक्षित प्रदर्शन करणं जमलं नाही. गतविजेता संघ म्हणून टीम इंडिया दुबईत दाखल झाली होती. पण सुपर 4 राऊंडमध्येच टीमचं आव्हान संपुष्टात आलं.
मुंबई: आशिया कपमध्ये टीम इंडियाला अपेक्षित प्रदर्शन करणं जमलं नाही. गतविजेता संघ म्हणून टीम इंडिया दुबईत दाखल झाली होती. पण सुपर 4 राऊंडमध्येच टीमचं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून टीम इंडियाचा पराभव झाला. तिथेच आव्हान संपुष्टात आलं होतं. या दोन्ही मॅचमध्ये ऋषभ पंतला संघात स्थान मिळालं होतं.
म्हणून दिनेश कार्तिकच्या जागी पंतला प्राधान्य
अफगाणिस्तान विरुद्धही ऋषभचा संघात समावेश करण्यात आला. पण आशिया कपमध्ये ऋषभ पंत प्रभावी कामगिरी करु शकला नाही. कॅप्टन रोहित शर्माला ऋषभ पंतच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. टीममध्ये लेफ्टी बॅट्समनला खेळवणं आवश्यक होतं, यासाठी पंतला दिनेश कार्तिकच्या जागी प्राधान्य दिलं, असं रोहितने सांगितलं.
हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही
टीम इंडियाच्या गरजेनुसार, ऋषभ पंत कामगिरी करु शकला नाही. तो फिनिशिंग टच देऊ शकला नाही. ऋषभचा दिनेश कार्तिकच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. कार्तिक आयपीएलमध्ये फिनिशरच्या रोलमध्ये होता. अशावेळी आशिया कपमध्ये कार्तिकला बाहेर बसवून पंतला टीममध्ये स्थान दिलं. पण हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही.
टीम इंडिया अडून राहणार?
डावखुऱ्या फलंदाजासाठी कार्तिकला बाहेर ठेवण्याचा निर्णय, टीमच्या पथ्यावर पडला नाही. आता टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा याच मुद्यावर अडून राहणार का? की, परफॉर्मन्सवर लक्ष देणार, हा प्रश्न आहे. पंत शिवाय रवींद्र जाडेजा लेफ्टी बॅटिंग करतो. पण दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय.
असा एकही लेफ्टी फलंदाज टीम इंडियामध्ये नाहीय
रवींद्र जाडेजाच्या जागी पर्याय म्हणून अक्षर पटेल आहे. तो सुद्धा डावखुरा फलंदाज आहे. प्लेइंग 11मध्ये लेफ्टी फलंदाज असलाच पाहिजे, हा अट्टहास टीम इंडियाला कुठे भारी पडू नये. फॉर्ममध्ये आहे आणि टीममध्ये स्थान मिळालच पाहिजे, सध्याच्या घडीला असा एकही लेफ्टी फलंदाज टीम इंडियामध्ये नाहीय. अशावेळी लेफ्टी फलंदाजाच्या मोहात योग्य संघनिवड चुकू शकते.
लेफ्टी बॅट्समन का हवा?
टीम इंडियाला लेफ्टी फलंदाज संघात का हवा? असा प्रश्न विचारला जातोय. लेफ्टी फलंदाज असला, की व्हरायटी मिळते. बॉलर्सना गोलंदाजी करताना अडचण येते. रायटी आणि लेफ्टी फलंदाज क्रीजवर असताना, गोलंदाजाला सतत आपली दिशा आणि टप्पा यामध्ये बदल करावा लागतो. त्याशिवाय सतत फिल्डिंग सुद्धा बदलावी लागते. त्यामुळे गोलंदाजाची लय बिघडू शकते. त्यामुळे इनफॉर्म लेफ्टी टीममध्ये असणं गरजेच आहे. सध्याच्याघडीला असा फलंदाज टीम इंडियात नाहीय. जाडेजानंतर पंत चांगला पर्याय होता. पण पंतच्या अपरिपक्वतेमुळे टीमच्या अडचणी वाढल्या.