IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर
क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने इंग्लंडवर तब्बल 151 धावांनी तगडा विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाचं गुपित स्वत: कर्णधार विराटने सांगितलं आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हा दुसरा सामना क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lord’s) मैदानात असल्याने हा विजय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. विजयात सर्वच खेळाडूंनी आपआपल्यापरीने योगदान दिले. कोणी तुफान, तर कोणी संयमी फलंदाजी केली. कोणी गोलंदाजी करताना कमी धावा दिल्या तर कोणी अधिक विकेट घेतल्या, अशाप्रकारे सर्वांच्या संयुक्त कामगिरीने भारत विजयी झाला.
पण या संपूर्ण सामन्यात एक वेळ अशी आली होती, की भारतीय संघाची नौका अगदी डळमळत होती. ज्यावेळी सामना अनिर्णीत करण्याकडे भारताचा कल असेल असे सर्वांना वाटत होते. पण त्यानंतर भारताने गगनभरारी घेत सामन्यात विजय मिळवला. ज्या विजयाला कोणत्या गोष्टींनी बळ दिले हे स्वत: कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितले आहे.
दुसऱ्या डावातील फलंदाजी ठरली महत्त्वाची
विराटने सामन्यानंतर बोलताना सर्व संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला, ”मला संपूर्ण संघावर गर्व आहे. आम्ही सर्व प्लॅन करुनच त्याप्रकारे विजय मिळवला. सर्व खेळाडूंचे प्रदर्शन उत्तम होते. पहिल्या तीन दिवशी मैदानात चेंडू जास्त हालचाल करत नव्हता. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी मात्र मैदानात खूप काही दिसून आले. त्याच वेळी आमचा फलंदाजीचा दुसरा डाव सुरु असून यावेळी आम्ही केलेली फलंदाजी विजयात महत्त्वाची ठरली.”
बुमराह-शमी जोडीची कमाल
सामन्याचत सर्वांचेत लक्ष वेधून घेतले ते बुमराह आणि शमी जोडीने नवव्या विकेटसाठी केलेल्या भागिदारीने. याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ”सर्वच खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले पण अखेरच्या दिवशी बुमराह आणि शमी यांनी केलेल्या अप्रतिम भागिदारीमुळे एक चांगले लक्ष्य इंग्लंडला देऊ शकतो. ज्यामुळे आम्ही गोलंदाजीमध्ये 60 ओव्हरच्या खेळात 10 विकेट्स नक्कीच घेऊ ही खात्री पटली.”
गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी
या विजयाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ”धोनी कर्णधार असतानाही 2014 मध्ये आम्ही लॉर्ड्सवर विजय मिळवला होता. पण यावेळीचा विजय त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. त्यावेळी इशांतने 7 विकेट घेतले होते. पण यावेळी ही कामगिरी केवळ 60 ओव्हरमध्ये करायची होती. अशावेळीही मोहम्मद सिराज जो पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानात खेळत होता. त्याने अप्रतिम गोलंदाजी करत ही कामगिरी केल्याने हा विजय अतिशय महत्तवाचा आहे. तसंच सिराज सोबत बुमराह, शमी, इशांत अशा साऱ्याच गोलंदाजानी विशेष कामगिरी केली. ज्यामुळे स्वातंत्रता दिवसाच्या एका दिवसानंतर आम्ही भारतवासियांना एक भेट देऊ शकलो.
इतर बातम्या
IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय
IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
India vs England : सिराजची खुन्नस, कोहलीची आक्रमकता, टीम इंडियाच्या विजयाचे 8 फोटो
(Indian Test team captain Virat Kohli tells reason behind indias Win at lords against england)