IND vs ENG : ऋषभ पंतला कोरोना, संघाला नव्या यष्टीरक्षकाची गरज, ‘या’ खेळाडूचं सूचक ट्वीट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशावेळी संघाचा यष्टीरक्षक ऋषभला कोरोनाची बाधा झाल्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

IND vs ENG : ऋषभ पंतला कोरोना, संघाला नव्या यष्टीरक्षकाची गरज, 'या' खेळाडूचं सूचक ट्वीट
दिनेश कार्तिक
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 7:07 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यांआधीच भारताचा एक महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित झाल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोनाबाधित झाल्यामुळे आता यष्टीरक्षक कोण? असा प्रश्न संघासमोर उभा ठाकला असून यावेळी केएल राहुल (KL Rahul) आणि रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) हे दोन पर्याय असतानाही एका आणखी क्रिकेटपटूने खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सध्या इंग्लंडमध्येच आहे.

हा खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सध्या कॉमेंटेटरची भूमिका निभावणारा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आहे. दिनेशने एक सूचक ट्विट करत जणू खेळण्याची इच्छाच दर्शविली आहे. कार्तिक याने त्याच्या किटबॅगचा फोटो ज्यावर विकेटकीपिंगचे हातमोजे ठेवले आहेत असा फोटो ट्वीट कर सोबत #Justsaying असं सूचक वाक्या लिहिलं आहे. ज्यातून संघाला गरज आणि इच्छा असल्यास मलाही खेळवू शकतात असंच म्हणण्याचा प्रयत्न केला आहे.

इंगलंडमध्येच शेवटची कसोटी

दिनेश कार्तिकने भारतासाठी एकूण 26 टेस्ट मॅच खेळत 1 हजार 25 धावा केलया आहेत. ज्यात एका शतकासह 7 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने शेवटची कसोटीही इंग्लंडमध्येच 2018 साली खेळली होती. शेवटच्या सामन्यात त्याने एका डावात एक धाव केली होती तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला होता.

संबंधित बातम्या 

ऋषभ पंतच्या कोरोनाबाधित होण्यामागील सत्य आलं समोर, Euro सामना नाही, तर ‘या’ ठिकाणी झाली कोरोनाची बाधा

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(Indian Wicket keeper Dinesh Karthik hints that he is Ready to Play in England series)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.