ऋषभ पंतच्या कोरोनाबाधित होण्यामागील सत्य आलं समोर, Euro सामना नाही, तर ‘या’ ठिकाणी झाली कोरोनाची बाधा

ऋषभ पंतला कोरोनाची बाधा होताच त्याचा संबध तो पाहायला गेलेल्या Euro 2020 सामन्यांशी असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. पण मूळात ही बाधा पंतला कुठे झाली असावी याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

ऋषभ पंतच्या कोरोनाबाधित होण्यामागील सत्य आलं समोर, Euro सामना नाही, तर 'या' ठिकाणी झाली कोरोनाची बाधा
ऋषभ पंत
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:59 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) कसोटी मालिका (Test Series) सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. संघ सरावासाठी डरहमला पोहोचला आहे. 20 जुलैपासून काउंटी इलेवनसोबत सराव सामनेही सुरु होणार आहेत. पण या सर्वात भारताचा हुकुमी एक्का यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोनाबाधित झाल्याने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. पंतला कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचा संसर्ग झाला आहे. दरम्यान हा संसर्ग झाला कुठे? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ज्यात पंत मित्रांसोबत युरो चषकाचा फुटबॉल सामना पाहायला गेला त्याचठिकाणी बाधा झाल्याची सर्वाधिक चर्चा आहे. पण सत्य काहीतरी वेगळच असून पंत आणखी एका ठिकाणी गेला होता जिथे त्याला कोरोनाची लागण झाल्याची दाट शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने छापलेल्या एका रिपोर्टनुसार पंतला संक्रमण होण्याचं ठिकाण कोणतंही असून शकतं. पण संक्रमण होण्याआधी तो इंग्लंडमध्ये एका डेंटिस्टकडे गेला होता आणि त्याच ठिकाणी त्याला कोरोनाती बाधा झाल्याची दाट शक्यता आहे. 8 जुलैला पंतला कोरोनाची बाधा झाली असून तो तेव्हापासून इंग्लंडमध्येच एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. TOI च्या रिपोर्टनुसार पंत 5 आणि 6 जुलैला डेंटिस्टकडे गेला होता. त्यानंतर 7 जुलैला संघातील इतर खेळाडूंसोबत तो लंडनमध्ये लशीचा दुसरा डोस घेण्यासाठीही गेला होता.

जय शाहने दिली पंत बद्दल महत्त्वाची माहिती

पंतच्या कोरोना पॉजिटिव्ह असण्यावर BCCI चे सचिव जय शाह म्हणाले की, ”पंत सुट्टी दरम्यान संघासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये नव्हता. त्यानंतरच तो 8 जुलैला कोरोनाबाधित आढळला. त्याच्यात असिम्पटोमेटिक लक्षणं आढळली आहेत. सध्या तो विलगीकरणात असून BCCI ची मेडिकल टीम त्याची विचारपूस करुन काळजी घेत आहे. यानंतर 2 टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच पंत भारतीय संघ पुन्हा जॉईन करेल”

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

संबंधित बातम्या 

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

(Indian Wicket keeper Rishabh Pants Dentist Visit in England Possible Source of he got infected of Corona Virus says Report)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.