IND W vs ENG W : सामन्यादरम्यान शेफाली वर्माने दाखवली एम एस धोनीची झलक, व्हिडीओ पाहून चाहत्यांना आठवला कॅप्टन कूल
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर सध्या भारतीय महिला एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत असून पहिले दोन्ही सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे.
लंडन : भारतीय पुरुष क्रिकेट संघासह महिला क्रिकेट संघही (Indian Women Cricket team) इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारतीय महिला एकमेव कसोटी सामना अनिर्णीक सोडल्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहेत. यात पहिल्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात युवा फलंदाज शेफाली वर्माच्या (Shefali Verma) एका कृतीने सर्वांना भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार एम एस धोनीची (MS Dhoni) आठवण करुन दिली. (Indian Women Batter Shefali Verma Reminds MS Dhoni Style While Batting against England in India Women vs England Women Match)
भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी केली. यावेळी सलामीवीर शेफालीने तिच्या खेळाला साजेशी खेळी करत धडाकेबाज 44 धावांची खेळी केली. 55 चेंडूत केलेल्या या खेळीत शेफालीने 7 चौकार लगावले. पण ती ज्याप्रकारे बाद झाली ते पाहून सर्वांना धोनी आठवला.
अशी केली धोनीची स्टाईल कॉपी
शेफाली धडाकेबाज खेळी करत असताना सोफी एक्केलस्टोनचा (Ecclestone) एक बॉल तिला समजला नाही आणि ती पुढे आल्यानंतर बॉल थेट यष्टीरक्षक एमी जोंसच्या (A Jones) हातात गेला. त्यावेळी स्टपिंगने बाद होण्यापासून वाचण्याकरता शेफालीने एक पाय पूर्णपणे लांब करुन क्रिजच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी असाच प्रयत्न धोनी देखील अनेकदा करायचा त्यामुळे शेफालीचा हा अंदाज पाहून सर्वांना धोनीची आठवण आली.
This is the second time in 2 ODI’s that we are making harder than it needs to be for the third umpire. Be great to get bright coloured bails pic.twitter.com/0bXAdO1jMw
— Lisa Sthalekar (@sthalekar93) June 30, 2021
भारतीय संघाचा पराभव
सामन्यान टॉस जिंकून इंग्लंडने पहिली गोलंदाजी घेतली. दरम्यान भारताने फलंदाजी करत 221 धावांपर्यंतच मजल मारली. ज्यात शेफालीच्या 44 धावांसह कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) 59 धावांची एकाकी झुंज कामी आली. मात्र इंग्लंडने त्या बदल्यात 47.3 ओव्हरमध्ये पाच विकेट गमावर 225 धावा केल्या. ज्यामध्ये सोफी डंकलेने (Sophia Dunkley) 81 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. भारतीय गोलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही आणि इंग्लंडच्या महिलांनी 5 विकेट्सने सामना खिशात घातला.
हे ही वाचा –
एका अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर
IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार
(Indian Women Batter Shefali Verma Reminds MS Dhoni Style While Batting against England in India Women vs England Women Match)