मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान

भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मानाचा रेकॉर्ड आपल्या नावे करत तिने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान
मिताली राज
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 11:13 AM

लंडन : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर रचनारी खेळाडू ठरली आहे. याआधी केवळ भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या मितालीने आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेेळाडू ठरली आहे. 38 वर्षीय मितालीने 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार 337 धावा करत इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड तोडले आहे. एडवर्ड्सने 10 हजार 273 रन केले आहेत. (Indian Women Cricket team captain Mithali Raj Becomes Highest Run Scorer in Women Cricket)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार मितालीने नाबाद 75 धावांची विजयी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. याच खेळीसोबत ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. सामन्यात 14 धावा करताच तिने शार्लोट एडवर्ड्सचा 10 हजार 273 धावांचा रेकॉर्ड मोडला. मितालीने हा धावांचा रेकॉर्ड क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून रचला आहे. तिने कसोटी क्रिकेमध्ये 669, टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार 364 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार 244 धावा केल्या आहेत. मिताली आणि एडवर्ड्सनंतर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या सूजी बेट्सच्या नावावर असून तिने 7 हजार 849 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड म्हटलं कि भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) नाव सर्वात आधी येतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज करणाऱा सचिन 2012 मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही अनेक रेकॉर्ड सचिनच्याच नावावर आहेत. त्यातीलच एक म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा म्हणजे 34 हजार 357 सचिनच्या नावावर आहेत. त्यात आता मिताली राजने सर्वाधिक धावा करत महिला क्रिकेटमध्येही भारतीयांचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे पुरुष क्रिकेटमध्ये सचिन तर महिला क्रिकेटमध्ये मिताली अशा दोघा भारतीयांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे सचिन आणि मिताली या दोघांनी देखील 16 वर्षे 205 दिवसांचे असताना आपला आंतरराष्ट्रीय सलामीचा सामना खेळला होता.

मितालीची कारकीर्द

16 वर्षाच्या वयात 1999 मध्ये आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने काही दिवासंपूर्वीच क्रिकेटमध्ये आपली 22 वर्षे पूर्ण केली. 2002 मध्ये पहिली टेस्ट आणि 2006 मध्ये पहिली वनडे खेळणाऱ्या मितालीने आतापर्यंत 11 टेस्ट, 216 वनडे आणि 89 टी-20 सामने खेळले आहेत.ज्यात 7 शतक आणि 78 अर्धशतक ठोकले आहेत. मिताली राज ही अवघ्या 22 वर्षे 353 दिवसांची असताना भारतीय टेस्ट टीमची कर्णधार झाली होती. त्यामुळे सर्वात कमी वयात कर्णधार होण्चा रेकॉर्डही तिच्याच नावावर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशातील खेळाडूंसाठी सर्वांत मानाचा पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) देखील मितालीच्या नावाची शिफारस केली.

हे ही वाचा :

मिताली राजचा अनोखा रेकॉर्ड, कोहली-रोहित शर्मासह अनेक दिग्गजांना टाकलं मागे, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह, भारताच्या दिग्गज फिरकीपटूची शिफारस

एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर

(Indian Women Cricket team captain Mithali Raj Becomes Highest Run Scorer in Women Cricket)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.