तब्बल सात वर्षानंतर भारतीय महिला कसोटीच्या मैदानात, टेस्ट जर्सी पाहून झाल्या भावूक
बराच काळ कसोटी सामन्यांपासून दूर राहिलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावर्षी दोन कसोटी सामने खेळणार आहे. आधी इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाशी भारतीय महिला भिडणार आहेत.
मुंबई : क्रिकेट इतिहासातील सर्वात जुना आणि मानाचा प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) जागतिक क्रिकेटमधील एक महत्त्वाचा संघ असूनही मागील बरीच वर्ष कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान यावर्षी संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. आधी इंग्लंड (England) आणि नंतर ऑस्ट्रेलिया (Australia) संघाशी भारतीय महिला भिडणार आहेत. याचसाठी महिलांना नव्या टेस्ट जर्सी सोपवण्यात आल्या. ज्या पाहून सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता, अनेकजणी जर्सी पाहून भावूक देखील झाल्या. भारताची युवा क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीगेजने (Jemimah Rodrigues) एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. (Indian Women Cricket Team New Test Jersey Launch Jemimah Rodrigues Posts Emotional Message)
भारताच्या महिला क्रिकेटपटू 2 जून रोजी इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. दौऱ्यात एकदिवसीय, टी-20 सामन्यांसह एक कसोटी सामना देखील खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी महिला परिधान करणार असलेली टेस्ट जर्सी रविवारी सर्व क्रिकेटपटूंना देण्यात आली. कर्णधार मिताली राज (Mitali Raj) आणि जेष्ठ गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांनी प्रत्येक खेळाडूला जर्सी सोपवली. याचवेळी प्रशिक्षक रमेश पोवार यांनी सर्वांना एक भावनिक संदेश दिला. याच संदेशाबद्दल सांगताना जेमिमा भावनिक झाली आणि तिने एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली.
काय आहे जेमिमाची पोस्ट?
भारताची 20 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जला टेस्ट जर्सी मिळताच तिने जर्सीच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने लिहिलं, ”आज रमेश पोवार सरांनी आम्हाला जर्सी दिल्यानंतर एका मीटिंगला बोलावलं. यावेळी त्यांनी भारतीय महिला क्रिकेटचा इतिहास, माजी महिला क्रिकेटपटूंबद्दल सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट कसं सुरु झालं आणि आता कुठवर पोहचलंय याबद्दल सांगितल. तसेच मिताली राज (मितू दी) आणि झूलन गोस्वामी (झूलू दी) या दिग्गजांनी आम्हाला त्यांचे क्रिकेट अनुभव शेअर केले. येणारी टेस्ट आणि पुढील सर्व सामने आम्ही माजी दिग्गजांसह देशातील प्रत्येक त्या मुलीसाठी खेळणार आहोत, ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे.”
Something that’s very close to my heart. Do read if possible 🙂 pic.twitter.com/dPic3n82fy
— Jemimah Rodrigues (@JemiRodrigues) May 30, 2021
असा असेल इंग्लंडचा दौरा
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकूण सात सामने खेळवले जातील. ज्यातील पहिला कसोटी सामना 16 जून रोजी ब्रिस्टॉल येथे खेळवला जाईल. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना ही ब्रिस्टॉल येथेच खेळवला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 30 जूनला टॉन्टनमध्ये खेळवण्यात आणि अखेरचा एकदिवसीय सामना वॉरेस्टरमध्ये पार पडणार आहे. एकदिवसीय सामन्यांनंतर टी-20 मालिकेला 9 जुलैला सुरुवात होईल. ज्यात पहिला सामना नॉर्थेम्प्टन, दुसरा सामना 11 जुलैला ब्रिगटॉन येथे खेळवला जाईल. दौऱ्यातील अखेरचा सामना चेम्सफोर्ड येथे 14 जुलैला खेळवण्यात येईल.
संबधित बातम्या :
इंग्लंडला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नमवण्यासाठी भारताच्या रणरागिणी सज्ज!
VIDEO : Harley Davidson वर बसून नवदीप सैनीने उडवला धुरळा, नेटिझन्स म्हणतात हिरोपंती कमी कर!
क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….
(Indian Women Cricket Team New Test Jersey Launch Jemimah Rodrigues Posts Emotional Message)