England Tour : भारतीय महिला संघाला BCCI कडून ‘गिफ्ट’, खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण
भारतीय पुरुष संघासोबतच महिला संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. यावेळी 7 वर्षानंतर महिला खेळाडू पुन्हा एकदा कसोटी सामना खेळणार आहेत.
लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 2 जून रोजी संघ इंग्लंडला पोहोचला असून सध्या विलगीकरणात आहे. कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारातील सामने महिला संघ खेळणार आहे. दरम्यान सामन्याआधीच महिला खेळाडूंना बीसीसीआयने एक आनंदाची बातमी दिली आहे. महिला खेळाडूंचा बाकी असणारा सर्व मोबदला बीसीसीआयने दिला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय महिलांना मागील टी-20 वर्ल्ड कप आणि मार्चमधील दक्षिण आफ्रीकेच्या दौऱ्याची फिस देण्यात आलेली नाही अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने समोर आणली होती. त्याच पार्श्वभूमीवर महिला खेळाडूंना सर्व उर्वरीत रक्कम बीसीसीआयने दिली आहे. (Indian Women Cricketers Salary Cleared by BCCI at England Tour)
भारतीय महिला 2020 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्या होत्या. इतक्या मोठ्या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत पोहचल्याने प्रत्येक महिला खेळाडूला 26 हजार डॉलर अर्थात 20 लाख रुपये देण्यात येणार होते. जे आतापर्यंत देणे बाकी होते. या सर्वामुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र अखेर सर्व रक्कम मिळाल्याने खेळाडूंसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऑस्ट्रेलियाने महिन्याभरातच दिला होता मोबदला
याच वर्ल्डकपमध्ये भारत अंतिम सामन्यात पराभूत झाला तर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी विजय मिळवला. ज्यामुळे त्यांना 1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपये पुरवण्यात आले. जे त्यांनी महिन्याभराच्या आतच खेळाडूंमध्ये वाटून टाकले. एका ब्रिटीश वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले होते. दुसरीकडे भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाख डॉलर म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपये मिळाले होते.
हे ही वाचा –
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!
WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…
WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव
(Indian Women Cricketers Salary Cleared by BCCI at England Tour)