मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या शार्दूलचा क्रिकेट प्रवास, ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंडपर्यंत हवा, असा घडला ‘Lord शार्दूल ठाकूर’

शार्दूल ठाकूर हा क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात आठव्या क्रमांकावर येत अर्धशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याने गोलंदाजीनेही आपली हवा केली आहे.

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या शार्दूलचा क्रिकेट प्रवास, ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंडपर्यंत हवा, असा घडला 'Lord शार्दूल ठाकूर'
शार्दूल ठाकूर
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 12:39 PM

मुंबई : भारतात ‘क्रिकेट’ हा केवळ एक खेळ नाही, तर भावना आहे. सामन्यांचा जीवकी प्राण आहे. त्यात मुंबई आणि आसपासची ठिकाणं म्हटलं तर क्रिकेटवेडी हजारो मुलं मिळतील. अगदी जेवणासाठी चमचा पकडायच्या आधी बॅट आणि बॉल हातात घेऊन क्रिकेट खेळू लागतात. असाच एक क्रिकेट वेडा ‘पालघरचा पोरगा’ अगदी ऑस्ट्रेलिया ते इंग्लंड अशा दिग्गज संघाना पाणी पाजत आहे. या वर्णनावरुन तुम्हाला कळालंच असेल, आम्ही कोणाबद्दल बोलतोय. होय शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) बद्दलच याठिकाणी आम्ही सांगत आहोत. एकेकाळी मुंबईच्या लोकलमध्ये सामान्यांप्रमाणे प्रवास करणारा शार्दूल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली हवा करत आहे. नुकतंच इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यातर त्याने अप्रतिम अष्टपैलू खेळीने सर्वांचीच मनं जिंकली. तर या शार्दूलची क्रिकेट कारकिर्द थोडक्यात पाहू…

सुरुवातीपासूनच आक्रमक पण अचूक

भारतीय संघात सध्या नवखा असला तरी एक वेगळी ओळख बनवणारा शार्दूल बालपणापासूनच आक्रमक आणि धाकड स्वभावाचा आहे. त्याचा एक किस्सा बराच प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या अंडर-23 संघाच्या निवडीदरम्यान माधव मंत्री चषक खेळला जात होता. त्यावेळी एका फलंदाजाने शार्दूलला जोरदार षटकार ठोकला. त्यानंतर ओव्हर संपवून सीमारेषेजवळ फिल्डिंगला गेल्यावर शार्दूलने राखीव खेळाडूंशी बोलताना आपला राग व्यक्त केला. तसंच ‘मला सिक्सर मारलाना आता बघ पुढच्या ओव्हरला मी काय करतो.’ असं म्हणत पुढच्या ओव्हरमध्येच शार्दूलने त्याच फलंजादाला क्लिन बोल्ड करत तंबूत धाडलं.

प्रशिक्षकांची मेहनत आणि शार्दूलचं यश

पालघरसारख्या ठिकाणाहून थेट भारतीय संघापर्यंत पोहोचणारा शार्दूल अवघ्या 14 वर्षांचा असताना त्याचे कोच दिनेश यांची नजर त्याच्यावर पडली. शालेय क्रिकेटमध्ये कांदीवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेचा सामना भोयसरच्या तारापूर विद्या मंदिरसोबत होता. तारापुरच्या संघात शार्दूल होता. त्याच ठिकाणी कांदीवलीच्या शाळेचा कोच दिनेशची नजर शार्दूलवर पडली. त्याने शार्दूलला आपल्या शाळेत अॅडमिशन घ्यायची ऑफर दिली. घर लांब असल्यामुळे स्वत:च्या घरी शार्दूलला रहायची सोय करुन देण्याची ऑफरही दिली. तिथून सुरु झाला शार्दूलचा खरा क्रिकेट प्रवास…

भेदक गतीचं शार्दूलला वर्दान

लहानपणीपासूनच गोलंदाजीमध्ये उत्तम ऑऊटस्विग टाकणाऱ्या शार्दूलच्या बोलिंगमध्ये वेगही होता. शरीराने भारदस्त नसला तरी शार्दूलची बोलिंग भल्याभल्यांना घाम फोडत. शार्दूलने 16 वर्षांता असताना 123 kmph वेगात चेंडू फेकत सर्वांनाच चकीत केलं होतं. त्यानंतर एका स्पर्धेदरम्यान 2008 साली श्रीशांत, टीए शेखर आणि उदय गुप्ता यांच्यासमोर त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यानंतर त्याला MRF पेस फाउंडेशनसाठी निवडण्यात आलं.

6 चेंडूत 6 षटकार

ठाकूरला केवळ गोलंजदाजीचीच नाही तर फलंदाजीचीही आवड आहे. त्याला अष्टपैलू खेळी करुनच भारतीय संघात स्थान मिळवायचं होत. त्याचदृष्टीने खेळणाऱ्या शार्दूलने मुंबईतील प्रसिद्ध हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंटमध्ये 2006 साली एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकत नवा रेकॉर्ड बनवला. त्या डावात त्याने 10 षटकार आणि  20 चौकार लगावत 73 चेंडूत 160 धावा केल्या. पण त्यानंतर 2012 मध्ये मुंबई रणजी संघात एका गोलंदाजाची जागा असल्याचं कळताच त्याने संपूर्ण लक्ष्य गोलंदाजीवर देत संघात स्थान मिळवलं.

शार्दूलने 65 प्रथम श्रेणी सामन्यात 218 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत मोठा कोणता रेकॉर्ड नावावर नसला तरी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आपला दबदबा निर्माण करत आहे. मुंबईच्या रणजी संघात संधी मिळताच दोन वर्षात शार्दूल IPL मध्येही सिलेक्ट झाला. 2014 मध्ये पंजाबकडून खेळणारा शार्दून दोन वर्षात केवळ एकच सामना खेळला. त्यानंतर  2017 मध्ये शार्दूलला धोनीच्या रायज़िंग पुणे सुपरजाएंट्स संघात स्थान मिळालं. त्याने त्या सीजनमध्ये 11 विकेट्स घेतले. ज्यामुळे 2018 मध्ये धोनीने त्याला चेन्नई संघात स्थान दिलं. त्याने त्यावर्षी 18 विकेट्स घेतले.

भारतीय संघात पदार्पण

आयपीएल गाजवल्यानंतर शार्दूलला 2018 मध्ये भारताच्या T-20 संघात स्थान मिळालं. तर 2020 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी संघातही शार्दूल संघात होता. गाबाच्या ऐतिहासिक विजयात शार्दूलने खेळलेली 67 धावांची खेळी अजरामर झाली. ज्यानंतर आता इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याला सामिल करण्यात आलं असून शार्दूल आता भारताचा भविष्यातील स्टार अष्टपैलू बनेल अशी सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे.

इतर बातम्या

Lord Shardul Thakur : दोन्ही डावात निर्णायक क्षणी अर्धशतकं, मग इंग्लंडचं ‘मूळ’ उखाडत विजयाचा पाया रचला

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

(Indian Young Cricketer Shardul thakur from palghar is performing very well in Team india Know his journey)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.