‘भारतीयही बोलतील, आमच्याकडे बाबर-रिझवान सारखे खेळाडू नाहीत’, पाकच्या माजी क्रिकेटपटूने उधळली मुक्ताफळं

या मालिकेत पाकिस्तानने प्रथमच टी-20 क्रिकेटमध्ये 208 या डोंगराएवढच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. एक षटक बाकी असताना, पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले.

'भारतीयही बोलतील, आमच्याकडे बाबर-रिझवान सारखे खेळाडू नाहीत', पाकच्या माजी क्रिकेटपटूने उधळली मुक्ताफळं
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 1:27 PM

लाहोर: बाबर आझमच्या (Babar azam) नेतृत्वाखाली पाकिस्तानी क्रिकेट संघ टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज (West indies series) विरुद्धच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानने (Pakistan) क्लीन स्वीप करत दिमाखदार विजय मिळवला. या मालिकेत पाकिस्तानने प्रथमच टी-20 क्रिकेटमध्ये 208 या डोंगराएवढच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. एक षटक बाकी असताना, पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले.

या सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिझवानने 45 चेंडूत 87 धावा तडकावल्या. कर्णधार बाबर आझमने 53 चेंडूत 79 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 158 धावांची भागीदारी केली. सलामीवीर म्हणू बाबर-रिझवानच्या जोडीने 150 पेक्षा जास्त धावांची सलामी देण्याची यंदाच्या वर्षातील ही चौथी वेळ आहे. पाकिस्तानात फलंदाजांपेक्षा जास्त चांगले गोलंदाज सापडतात. बाबर-रिझवान जोडी अपवाद आहे.

या कामगिरीने आनंदीत झालेला पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक राशिद लतिफने बाबर-रिझवान जोडीची भारतीय फलंदाजांबरोबर तुलना केली. ही तुलना करताना राशिद लतिफने मुक्ताफळं उधळली. “वर्षभरापूर्वी आम्ही बोलत होतो की, आमच्याकडे टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सारखे फलंदाज नाहीयत. पण आता मला असं वाटतं की, काही काळाने भारतीयही बोलतील, आमच्याकडे मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम सारखे फलंदाज नाहीत” राशिद लतिफने पीटीव्ही स्पोटर्सशी बोलताना हे वक्तव्य केले. मागच्यावर्षीच्या तुलनेत स्ट्राइक रेटमध्ये सुधारणा केल्याबद्दलही लतिफने दोघांचे कौतुक केले.

संबंधित बातम्या:

स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास…. ना ‘नो बॉल’, ना ‘डेड बॉल’, फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO AUS vs ENG: अखेर अ‍ॅशेस सीरीजमध्ये कोरोनाची एंट्री, कसोटी मालिका धोक्यात?

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.