Video: चर्चा IPL ची नाही, ह्या एका बॉलची, महिला क्रिकेटमधला हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ बॉल टाकलाय?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ची आघाडी घेतली आहे.

Video: चर्चा IPL ची नाही, ह्या एका बॉलची, महिला क्रिकेटमधला हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ बॉल टाकलाय?
शिखा पांडे
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 9:55 PM

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून सध्या टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. ज्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सने विजयी झाला. दरम्यान सामना भारताने गमावला, पण सामन्यात भारतीय गोलंदाज शिखा पांडे (Shikha Pandey) हीने फेकलेल्या एका चेंडूने मात्र भारतीय महिला क्रिकेटचं नाव जगभरात मोठं केलं.

शिखाने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलीयाच्या सलामीवीर एलिसा हीलीला त्रिफळाचित केलं. ऐकायला जरी ही सामन्य विकेट वाटत असली तरी ज्याप्रकारे हा चेंडू फेकण्यात आला आणि स्विंग झाला ते पाहून चांगल्या चांगल्यांचे डोळे फिरतील. अनेकांनी तर या डिलेव्हरीला महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डिलेव्हरी असल्याचंही म्हटलं आहे. अनेकांनी या डिलेव्हरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत त्याचं कौतुक केलं आहे.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलिया विजयी

सामन्यात भारतीय फलंदाजानी प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार हरमणप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांनी केवळ काही काळ झुंज दिली. पुजाने शेवटच्या काही षटकांत 27 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. ज्यामुळे भारत किमान 118 धावा करु शकला. त्याआधी कर्णधार कौरने 28 धावा केल्या होत्या. इतर सर्व फलंदाज अयशस्वी झाले.

त्यानंतर 119 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाकी सुरुवात चांगली नव्हती. दुसऱ्या चेंडूवरच एलिसा हीली बाद झाली. ज्यानंतर मेग लेनिंग (4) आणि बेथ मूनी (34) यांनी डाव सांभाळला. पण गायकवाडने दोघांना बाद केलं. पण अखेर ताहलिया मॅक्गाने नाबाद 42 धावा करत संघाला 5 चेंडू आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

IPL 2021: तगडी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी, अपयशामागे संघातीलच पाच खेळाडू कारण

T20 World Cup 2021 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज संघाबाेहर

IPL 2021 च्या लीग सामन्यांनंतर ऑरेंज कॅप केएल राहुलकडे, अशी आहे संपूर्ण यादी

(Indias Bowler Shikha Pandeys Throwes Best Ball of Womens Cricket In India vs Australia 2nd t20 see Video)

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....