भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

श्रीलंकेत क्रिकेटच्या मैदानात परत अवतरणारा हा क्रिकेटपटू भारताच्या अष्टपैलू क्रिकेटर्समधील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन
Yusuf pathan
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 1:52 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या  (Team India) चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका दिग्‍गज अष्टपैलू खेळाडूंने पुन्हा मैदानावर अवतरण्याची तयारी दर्शवली आहे. या खेळाडूचे पुनरागमन श्रीलंकेच्या भूमित होणार आहे. भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात अवतरणाऱ्या या खेळाडूने जगभरात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजाना सलो की पळो केलं होतं. तर फिरकीच्या जोरावर दिग्गज फलंदाजाना तंबूत धाडलं होत. बराच काळ भारतीय संघातून खेळलेल्या या खेळाडूने यंदाच फेब्रुवारी, 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

तर ही संपूर्ण चर्चा सुरु असलेला खेळाडू म्हणजे भारताच्या लाडक्या पठाण ब्रदर्समधील एक युसूफ पठान (Yusuf Pathan). यूसुफ लवकरच सुरु होणाऱ्या लंका प्रीमियर लीगसाठी (Lanka Premier League) खेळणार असल्याची माहिती समोर आली असून त्याने स्वत:ला रजिस्‍टर देखील केलं आहे. अनेक देशांचे दिग्गज या स्पर्धेत खेळणार आहेत. युसूफने नुकतेच आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून सन्यांस घेतल्यानंतर रोड सेफ्टी वर्ल्‍ड सीरीजमध्ये दिग्गज भारतीय संघातून खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावर हाहाकार करण्यासाठी युसूफ तयार झाला आहे. युसूफचा भाऊ इरफान पठान (Irfan Pathan) याच लीगमध्ये कँडी टस्‍कर्समधून खेळतो.  जुलैच्या अखेरीस लंका प्रीमियर लीग सुरु होणार आहे.

अनेक दिग्गजही अवतरणार

लंका प्रीमियर लीगमध्ये अनेक देशांचे दिग्गज खेळाडू खेळणार आहे. यात ऑस्‍ट्रेलियाच्या उस्‍मान ख्‍वाजा, बेन डंक, कॅलम फर्ग्‍युसन, जेम्‍स फॉकनर बेन कटिंग यांचा समावेश आहे. तर बांग्‍लादेशच्या तमीम इकबाल, मेहदी हसन मिराज, तस्‍किन अहमद, लिटन दास, सौम्‍य सरकार यांचाही समावेश आहे. वेस्ट इंडीजचा विचार करता निकोलस पूरन, शेल्‍डन कॉटरेल, रेयाद एमरिट, रवि रामपाल, ड्वेन स्मिथ, दिनेश रामदीन, जॉनसन चार्ल्‍स, रोवमॅन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड हे खेळणार असून पाकिस्‍तानच्या हारिस सोहेल, वकास मकसूद, मोहम्‍मद इरफान, शोएब मकसूद, शान मसूद, अनवर अली आणि अम्‍माद बट यांचा समावेश आहे

हे ही वाचा :

14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

‘या’ फलंदाजाने 26 चेंडूत ठोकल्या 124 धावा, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्डही केला नावे

(Indias Former All Rounder Cricketer Yusuf Pathan Will Play in Lanka Premier League)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.