फिक्सिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूकडे Yuvrajn Singh चं काय काम? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

युवराज सिंगचा (Yuvraj Singh) अमेरिकेतून (America) समोर आलेला एक फोटो वेगाने व्हायरल होतोय. सोशल मीडियावर प्रचंड वेगाने हा फोटो व्हायरल झाला आहे.

फिक्सिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूकडे Yuvrajn Singh चं काय काम? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो
cricketer yuvraj singh met with pakistan pacer mohammad asif in America Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:08 PM

मुंबई: युवराज सिंगचा (Yuvraj Singh) अमेरिकेतून (America) समोर आलेला एक फोटो वेगाने व्हायरल होतोय. सोशल मीडियावर प्रचंड वेगाने हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण आहे, ते युवराज सिंगच्या शेजारी उभा असलेला खेळाडू. या प्लेयरने 12 वर्षापूर्वी त्यांच्या देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली होती. युवराज सिंग सोबत फोटोत दिसणारा हा खेळाडू आहे, पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आसिफ. मोहम्मद आसिफने (Mohammad Asif) त्याच्या टि्वटर हँडलवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर चर्चेत आला. अमेरिकेत स्पोर्ट्सशी संबंधित एका कार्यक्रमात मोहम्मद आसिफ आणि युवराज सिंग सहभागी झाले होते, त्या कार्यक्रमातला हा फोटो आहे. मोहम्मद आसिफ पाकिस्तानातील वादग्रस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 2010 साली लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर पाच वर्षासाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली.

‘मैत्रीला कुठलीही सीमा नसते’

मोहम्मद आसिफ तुरुंगातही होता. 2016 मध्ये मोहम्मद आसिफवरील ही बंदी हटवली. पण तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकला नाही. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही वर्ष जरुर खेळला. युवराज सिंगचा फोटो व्हायरल होण्यामागे हे कारण आहे. कारण फिक्सिंगचा आरोप झालेल्या क्रिकेटपटूसोबत युवराज फोटोमध्ये दिसतोय. ‘मैत्रीला कुठलीही सीमा नसते’ असं कॅप्शन मोहम्मद आसिफने या फोटोला दिलय.

रुमान रईस बरोबरही झाली भेट

अमेरिकेत युवराज सिंह मोहम्मद आसिफला भेटलाच. पण त्याचवेळी लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज रुमान रईस बरोबरही त्याची भेट झाली. रुमान मागच्या 4 वर्षांपासून पाकिस्तानी क्रिकेट संघातून बाहेर आहे. रुमान रईसने सोशल मीडियावर मोहम्मद आसिफसोबत फोटो शेयर केलाय. ‘यांच्याशी बोलून क्रिकेट समजणं सोपं झालं’ असं त्याने या फोटोला कॅप्शन दिलय. ‘आसिफ भाईंना भेटून, त्यांच्याशी क्रिकेटबद्दल बोलून बरं वाटलं’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलय. मोहम्मद आसिफने पाकिस्तानसाठी 72 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.