Birthday Special : 31 डावांत 10 वेळा शून्यावर बाद, गोलंदाजीत मात्र अव्वल, भारताच्या पहिल्या स्टार फिरकीपटूची कहानी

या दिग्गज क्रिकेटपटूने चार वेळा एक डावांत पाच विकेट घेतल्या होत्या ज्यातील तीन वेळेस भारत पराभूत झाला होता. मात्र तरीदेखील या खेळाडूचा खेळ कायम वाखाणण्याजोगा होता.

Birthday Special : 31 डावांत 10 वेळा शून्यावर बाद, गोलंदाजीत मात्र अव्वल, भारताच्या पहिल्या स्टार फिरकीपटूची कहानी
गुलाम अहमद
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 12:35 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अलीकडे वेगवान गोलंदाजाची फौज आली असली तरी याआधी अनेक वर्ष भारताने फिरकीच्या जोरावरच जगभरातील फलंदाजाना सळो की पळो केलं. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) सर्वात यशस्वी फिरकीपटू असला तरी या भारता पहिला स्टार ऑफ स्पिनर म्हणून ज्यांना ओळखलं जात ते म्हणजे गुलाम अहमद (Gulam Ahmad). गुलाम यांचा जन्म आजच्याच दिवशी 1922 मध्ये हैद्राबादमध्ये झाला होता.

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Saniya Mirza) हिच्याशी देखील गुलाम यांचे नाते आहे. ते सानियाचे आजोबा लागतात. भारताचे पहिले स्टार ऑफ स्पिनर असणाऱ्या गुलाम अहमद यांनी 10 वर्षे भारतीय संघात महत्त्वाचे स्थान निभावले. दिग्गज फिरकीपटू वीनू मांकड़ आणि सुभाष गुप्ते यांच्यासह मिळून गुलाम यांनी भारताचे पहिले फिरकीपटू त्रिकुट तयार केले होते. या त्रिकुटाने जागतिक क्रिकेट गाजवून सोडले होते. त्यात गुलाम यांचा विचार केला तर उंच पण बारीक असे गुलाम यांची बोलिंगची अॅक्शन अगदी साधी होती. मात्र लाइन आणि लेंथवर त्यांची पकड उत्तम होती. त्यांनी भारतासाठी 22 कसोटी सामन्यांत 68 विकेट्स घेतले होते.

एका सामन्यात 10 विकेट्स

गुलाम अहमद यांनी त्यांच्या कारकिर्दीत चार वेळा एका डावांत पांच विकेट घेतले होते. पण त्यातील तीन वेळा भारत पराभूत झाला होता. असे असतानाही त्यांचा खेळ मात्र पाहण्याजोगा असायचा ज्यामुळे क्रिकेटप्रेमी कायमच गुलाम यांना दिग्गज मानतात. 1951-52 च्या सीजनमध्ये भारताच्या पहिल्या टेस्टमध्येही त्यांच विशेष योगदान होतं. त्यानंतर 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात कोलकाता येथे एका टेस्टमध्ये त्यांनी 10 विकेट्स घेतले होते. ज्यातील 7 विकेट्स पहिल्या डावात तर बाकी 3 विकेट्स दुसऱ्या डावात घेतले होते.

31 डावांत 10 वेळा शून्यावर बाद

गुलाम यांच्या फलंदाजीचा विचार करता ते आक्रमकरित्या खेळत होते. त्यामुळे ते लगेचच बाद देखील होत होते. त्यामुळे 31 डावांमध्ये ते 10 वेळा शून्यावर बाद झाले होते. पण 1952 मध्ये पाकिस्तान विरोदात त्यांनी नवी दिल्ली येथील टेस्टमध्ये अर्धशतक देखील झळकावले होते. त्यांनी हेमू अधिकारी यांच्यासोबत मिळून शेवटच्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हैद्राबादकडून त्यांनी तब्बल 407 विकेट्स घेतले होते.

हे ही वाचा :

‘या’ फलंदाजाने 26 चेंडूत ठोकल्या 124 धावा, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्डही केला नावे

14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?

मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान

(Indias Legendry Former Off Spinner Gulam Ahmed Birthday Today)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.