IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘ही’ आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर लॉर्ड्स मैदानावरील दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या विजयात सर्वच खेळाडूंने आपल्यापरीने योगदान दिले.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 'ही' आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 1:06 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका रंगतदार स्थितीत आली आहे. पहिला सामना पावासामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर दुसरा सामना भारताने 151 धावांनी जिंकला. आता या 5 कसोची सामन्यातील तिसरा सामना 25 ऑगस्ट रोजी हेडिंग्ले येथे सुरु होईल. या सामन्यातही पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे भारताची ताकद ही त्यांनी वेगवान गोलंदाजी अर्थात पेस अटॅक असेल, असं विधान इंग्लंडचा माजी कर्णधार डेविड गावरने (David Gower) केलं आहे.

डेविड गावरने भारताच्या वेगवान गोलंदाजीचं तोंडभरुन कौैतुक केलं. इंग्लंडसाठी 117 कसोटी सामने आणि 114 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या डेविड क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना म्हणाला, ”टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांचा पेस अटॅक शानदार आहे. भारत रविचंद्रन आश्विनसारख्या स्टार फिरकीपटूविना देकील पहिल्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाजांच्या जीवावर उत्तम कामगिरी करु शकला आहे.”

‘भारताचे वेगवान गोलंदाज आहेत मॅच विनर’

पहिल्या दोन कसोटी सामन्यांबाबत बोलताना डेविड म्हणाला, “हे पाहून चांगले वाटते की वेगवान गोलंदाज ही भारतीय संघाची ताकद आहे. या वेगवान गोलंदाजामध्ये संघाला अवघड सामनाही जिंकवून देण्याची क्षमता आहे.” विराट कोहली देखील गोलंदाजावर सध्या अधिक विश्वास करत असून त्याच्या मते कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजच सामना जिंकवून देतात.

कसोटी मालिकेत बुमराह टॉपवर

इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत  भारतीय वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळेच पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर टॉप 3 मधील 2 खेळाडू हे भारताचे आहेत. आतापर्यंत 18.50 च्या सरासरीने बुमरहने 12 विकेट्स मिळवले आहेत. बुमराहनंतर 11 विकेट्स घेत सिराज दुसऱ्या नावावर तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन  9 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

इतर बातम्या

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती

विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीला भारत नाही, ‘हा’ संघ वाटतो यंदाच्या टी-20 विश्व चषकाचा दावेदार, वाचा कारण

(Indias Pace attack is important for india to win against england says david gower)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.