17 वर्षीय गोलंदाजाची कमाल, एम एस धोनी क्लीन बोल्ड, पंत-पंड्याही बाद

प्रहर्ष पारीख असे या खेळाडूचे नाव आहे. 2019 च्या विश्वचषकात तो भारतीय संघासोबत नेट-बॉलर म्हणून होता.

17 वर्षीय गोलंदाजाची कमाल, एम एस धोनी क्लीन बोल्ड, पंत-पंड्याही बाद
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:06 PM

लंडन : भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरलेला विश्वचषक म्हणजे 2019 चा इंग्लंडमध्ये पार पडलेला विश्वचषक. सेमी-फायनलमध्ये भारत न्यूझीलंडकडून (INDvsNZ) पराभूत झालाच पण त्याचसोबत तोच सामना महान खेळाडू एम. एस. धोनीचाही (M S Dhoni) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. धोनीने त्यानंतर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेतली. दरम्यान 2019 च्या विश्वचषकादरम्यान धोनीला नेट प्रॅक्टिसमध्ये एका 17 वर्षाच्या क्रिकेटपटूने क्लिन-बोल्ड केलं होतं. प्रहर्ष पारीख (Praharsh Parikh) असं त्याच नाव असून तो एक ऑफ स्पिनर आहे. (Indias Praharsh Parikh Bowled MS Dhoni During 2019 World Cup Net Practice)

भारतीय वंशाचा प्रहर्ष इंग्लंडमध्ये स्थायिक आहे. तो तेथे लंकाशर काउंटी या संघाकडून क्रिकेट खेळतो. 2019 च्या विश्वचषकात प्रहर्ष भारतासह इतर संघासाठीही नेट बॉलर होता. याच दरम्यान भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी 15 जून 2019 रोजी प्रहर्षने प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीला बोल्ड केलं. त्यावेळी प्रहर्ष खूप जास्त खुश झाला होता. त्यानंतर हिंदुस्तान टाइम्स बरोबर बोलताना प्रहर्ष म्हणाला, ”हा अनुभव मला जीवनभर लक्षात राहिल. धोनी यांना बोल्ड केल्यानंतर मला नेमकं कळत नव्हतं की काय करु? आनंद साजरा करु कि नको असं झालं होत. नेट बॉलिंग करताना मी बऱ्याच संघातील बऱ्याच खेळाडूंना बाद केलं. पण धोनी यांची विकेट कायम लक्षात राहिल.”

अनेक संघाच्या दिग्गजांची घेतली विकेट

संपूर्ण प्रॅक्टिस मॅचसमध्ये प्रहर्षने भारतासह इतरही संघासाठी नेट बॉलींग केली होती. यावेळी धोनीसह हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत या भारतीयांना त्याने बाद केलं होत. तसेच वेस्ट इंडीजचा एविन लुईस, निकोलस पूरन, पाकिस्तानचा बाबर आजम, इमाम उल हक, आफगानिस्तानचा आदिल रशीद आदींना प्रहर्षने बाद केलं होत.

हे ही वाचा :

‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

तब्बल सात वर्षानंतर भारतीय महिला कसोटीच्या मैदानात, टेस्ट जर्सी पाहून झाल्या भावूक

(Indias Praharsh Parikh Bowled MS Dhoni During 2019 World Cup Net Practice)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.