शिखर धवन-ऋषभ पंत सोबतच्या क्रिकेटपटूचा क्रिकेटला राम राम, आठवड्याभरात दुसऱ्या क्रिकेटपटूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
भारतीय अंडर 19 संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदने 13 ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून संन्यास घेत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंचं संन्यास घेण्याचं सत्र सुरुच आहे. भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या उन्मुक्त चंदने काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मनन शर्मा (Manan Sharma) असं या खेळाडूच नाव असून तो दिल्ली क्रिकेट संघाचा (Delhi Cricket Team) महत्त्वाचा खेळाडू आहे. शिखर धवन, गौतम गंभीर, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत सारख्या दिग्गजांचा सहकारी असणाऱा हा खेळाडू 2010 च्या अंडर 19 विश्वचषक संघातही भारतीय संघात होता.
मनन शर्माबाबत सांगायचे झाले तर तो माजी भारतीय क्रिकेटपटू अजय शर्मा यांचा मुलगा आहे. 30 वर्षीय मनन शर्माने 35 प्रथम श्रेणी सामने खेळले असून आता तो अमेरिकेला रवाना होणार आहे. काही भारतीय खेळाडूंनी भारतीय संघातून निवृत्तीनंतर अमेरिकेकडून खेळण्यास सुरुवात केली. उन्मुक्त चंद, स्मित पटेल अशी काही खेळाडूंची नावं आहेत. यांच्याप्रमाणेच मननही अमेरिका संघाकडून खेळण्याची चर्चा आहे.
Manan Sharma, Delhi and India under-19 cricketer, has announced his retirement from all forms of game. Manan, 30, played 35 First Class matches. He will now move to California. His father Ajay played Test cricket for India. pic.twitter.com/SdYbr0enBI
— Vijay Lokapally (@vijaylokapally) August 19, 2021
मननची आतापर्यंतची कारकिर्द
डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाज असणारा मनन शर्मा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. 35 प्रथम श्रेणी सामन्यात एका शतकासह आठ अर्धशतकं मननच्या नावावर असून 1 हजार 208 धावाही आहेत. यासोबतच 113 विकेटही त्याने पटकावल्या आहेत. तर 59 लिस्ट ए सामन्यात 560 धावांसह 78 विकेट्स मननच्या नावावर आहेत. 26 टी-20 सामन्यात मननने 131 धावा करत 32 विकेट्स खिशात टाकल्या आहेत. तो अखेरच्या वेळी दिल्लीसाठी लिस्ट ए क्रिकेटचा सामना ऑक्टोबर, 2019 मध्ये खेळला होता. यासोबतच आय़पीएल (IPL) मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाकडूनही खेळला आहे.
इतर बातम्या
(Indias u19 cricketer delhi player manan sharma retires from all forms of Cricket)