महिला क्रिकेटपटूंची ICC Rankings जाहीर, मिथाली पहिल्या स्थानावर कायम, अष्टपैलू दीप्तीचं दुहेरी यश

भारतीय पुरुषांप्रमाणे भारतीय महिला क्रिकेटपटूही जागतिक क्रिकेटमध्ये नवी शिखरं सर करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी जागतिक महिला क्रिकेटर्सच्या गुणवत्ता यादीत मिथालीने पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

महिला क्रिकेटपटूंची ICC Rankings जाहीर, मिथाली पहिल्या स्थानावर कायम, अष्टपैलू दीप्तीचं दुहेरी यश
मिथाली राज
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:40 PM

ICC Women Ranking: भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिथाली राजने (Mithali Raj) आयसीसीच्या नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक रँकिंगमध्ये (ICC Ranking) पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. फक्त यावेळी तिला हे स्थान वाटून घ्यावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाज लिजेल ली (Lizelle Lee) ही देखील पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दोघीही 762 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. ली हीने नुकतीच वेस्टइंडीज संघाविरुद्ध अप्रतिम अर्धशतखी खेळी केली. तिने वेस्टइंडीज संघाविरुद्ध  नाबाद 91 धावा केल्या.

मिथाली पाठोपाठ ऑस्ट्रेलियाची एलिसा तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर भारताची आणखी एक फलंदाज टॉप 10 मध्ये असून तिचं नाव स्म्रिती मंधाना असं आहे. नवव्या स्थानावर असणारी स्म्रिती7o1 गुण मिळवण्यात यशस्वी झाली आहे. एकदिवसीय प्रकारानंतर टी-20 मध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात 759 गुण आहेत. तर एकदिवसीय रँकिगमध्ये नवव्या स्थानावर असणारी स्म्रिती टी-20 मध्ये 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

गोलंदाजीतही भारताच्या महिलांची चमकदार कामगिरी

भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी आणि दिग्गज फिरकीपटू पूनम यादव यांनी गोलंदाजाच्या रँकिगमध्ये अनुक्रमे पाचवं आणि नववं स्थान पटकावलं आहे. झुलनच्या खात्यात 694 तर पूनमच्या खात्यात 617 गुण आहेत. या दोघींसह भारताची दीप्ती शर्मा 12 व्या तर शिखा पांडे 14 व्या स्थानावर कायम आहे.

दीप्ती शर्माची दुहेरी कामगिरी

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही प्रकारात भारतासाठी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने (Deepti Sharma) अष्टपैलू खेळाडूंच्या रंकिंगमध्ये 321 गुणांसह चौथं स्थान पटकावलं आहे. सोबतच टी-20 गोलंदाजाच्या रँकिगमध्येही ती टॉप 10 मध्ये असून ती 703 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

हे ही वाचा-

Birthday Special : गल्लीत क्रिकेट खेळायचा, आज फलंदाजीने वादळ उठवतो, विश्वचषकाच्या संघात भारताचा हुकुमी एक्का

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

T20 World Cup पूर्वी जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडूची निवृत्ती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

(Indias Women Cricketer are in good position at ICC women ranking mithali tops odi and deepti in All rounders)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.