मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!
क्वीन्सलँडमध्ये सुरु असलेल्या डे-नाईट टेस्ट (INDW vs AUSW Pink Ball test) च्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. मंधानाचे कसोटीतील हे पहिलेच शतक आहे. तिने एलिसा पॅरीच्या चेंडूवर चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले. या शतकासह तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
मुंबई : क्वीन्सलँडमध्ये सुरु असलेल्या डे-नाईट टेस्ट (INDW vs AUSW Pink Ball test) च्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. मंधानाचे कसोटीतील हे पहिलेच शतक आहे. तिने एलिसा पॅरीच्या चेंडूवर चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले. या शतकासह तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पिंक-बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी मंधाना ही पहिलीच भारतीय महिला आणि दुसरी क्रिकेटपटू आहे. त्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli) हा विक्रम केले. कोहलीने हा पराक्रम दोन वर्षांपूर्वी बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे डे-नाईट कसोटीत केला होता.
Alexa please play: “oh haseena zulfo vali!!!” @mandhana_smriti pic.twitter.com/9wLeMhVIWB
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) October 1, 2021
मंधानाच्या पिंक-बॉल टेस्टमधील या खेळीने सर्वांची मने जिंकली. तिच्या सहकारी खेळाडू हरलीन देओलने (Harleen Deol) मंधानाच्या शतकाचा फोटो शेअर करताना ट्विटरवर लिहिले की “अलेक्सा, कृपया हे गाणे वाजवा – ओ हसीना जुल्फोंवाली”. हरलीनच्या या कमेंटला मंधानाने एक मजेदार उत्तर दिले. तिने लिहिले की “अलेक्सा, कृपया हरलीनला म्यूट करा”. हरलीन सध्याच्या टेस्ट मॅच खेळत नाहीये.
Alexa please put @imharleenDeol on mute ? https://t.co/szmExAFOZg
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) October 1, 2021
मंधानाने कॅरेरा कसोटीत 216 चेंडूत 22 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 127 धावा केल्या. तिने पूनम राऊतसोबत दुसऱ्या विकेटसाठी 102 धावा जोडल्या, जो ऑस्ट्रेलियातील विक्रम आहे. त्यापूर्वी, तिने शेफाली वर्मासोबत 93 धावांची भागीदारी केली. मंधानाच्या 127 धावा ऑस्ट्रेलियामधील कसोटीतील कोणत्याही महिला फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या मॉली हायडने ऑस्ट्रेलियामध्ये 124 धावांची नाबाद खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी शतक झळकावणारी मंधाना दुसरी भारतीय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावणारी मंधाना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी 1984 मध्ये संध्या अग्रवालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची खेळी खेळली होती. कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिलेचे हे पहिले शतक होते. 1991 मध्ये रजनी वेणुगोपालची 58 ही ऑस्ट्रेलियासाठी भारताची यापूर्वीची सर्वोच्च कसोटी धावसंख्या होती.
IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरीhttps://t.co/dkUrSqN4Ok#CSK | #RuturajGaikwad | #IPL2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
संबंधित बातम्या :
IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी
IPL 2021: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या तिन्ही संघात एक साम्य, ‘हे’ आहे विजयामागचं गुपीत!