Harmanpreet Kaur | अगं हे काय केलं? नाराज हरमनप्रीत कौरची मैदानात धक्कादायक कृती, VIDEO व्हायरल
Harmanpreet Kaur | 'पुढच्यावेळी बांग्लादेशमध्ये येऊ तेव्हा....' मॅच संपल्यानंतर हरमनप्रीत कौरच मोठं वक्तव्य. हरमनप्रीतने मैदानात जे वर्तन केलं, त्याची सर्वत्र चर्चा आहे.
नवी दिल्ली : भारत आणि बांग्लादेशच्या महिला टीममध्ये ढाकाच्या शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर तिसरा वनडे सामना खेळला गेला. भारत आणि बांग्लादेशंमधील हा सामना टाय झाला. या मॅचमध्ये भारताच्या महिला टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर अंपायरिंगवर खूप नाराज दिसली. हरमनप्रीतने मैदानात जे वर्तन केलं, त्याची सर्वत्र चर्चा आहे. तिने स्टम्पवर बॅट मारली.
226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय टीमने हरमनप्रीत कौरच्या रुपात चौथा विकेट गमावला. 34 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हा विकेट गेला. भारतीय कॅप्टन स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू तिच्या पॅडला लागला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
गोलंदाज नाहिदा अख्तरने अपील केलं. अंपायरने हरमनप्रीत एलबीडब्ल्यू असल्याचा कौल दिला. हरमनप्रीत कौर अंपायरच्या निर्णयावर खूप नाराज दिसली. बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याआधी स्टम्पवर बॅट मारली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. तिने पॅव्हेलियनमध्ये परतताना अंपायरला सुद्धा काही सांगितलं. भारतीय कॅप्टन हरमनप्रीतने 21 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या.
अंपायरिंगवर नाराज असलेली हरमनप्रीत काय म्हणाली?
“या मॅचमधून आमच्यासाठी शिकण्यासाठी बरच काही आहे. क्रिकेटशिवाय ज्या पद्धतीची अंपायरिंग झाली, त्यावर मी हैराण आहे. पुढच्यावेळी आम्ही बांग्लादेशमध्ये येऊ, त्यावेळी अशा पद्धतीच्या अंपायरिंगनुसार आम्हाला खेळायचे आहे, हे ठरवून तशी तयारी करुन येऊ” असं हरमनप्रीत अंपायरिंग बद्दल म्हणाली.
IND-W captain Harmanpreet hit the stumps, shouts at the umpire then showed middle finger & thumb to the fans after given LBW by the umpire, claiming it was bat. little did she know the catch was taken as well by the fielder. Again complained about the umpire at match presentation pic.twitter.com/VbjrT1Ijp7
— SazzaDul Islam (@iam_sazzad) July 22, 2023
भारताकडून कोणी सर्वात जास्त धावा केल्या?
भारत आणि बांग्लादेशच्या महिला टीममध्ये तिसरा वनडे सामना झाला. बांग्लादेशच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 225 धावा केल्या. टीमची ओपनर फरगाना हकने 7 चौकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. त्याशिवाय दुसरी ओपनर शमीमा सुल्तानाने 5 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना भारतीय टीमने 49.3 ओव्हर्समध्ये 225 धावाच केल्या. टीमकडून हरलीन देओलने 9 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. ही सीरीज 1-1 अशी बरोबरीत राहिली.