Robin uthappa: दुबईत उथाप्पाच्या बॅटचा तडाखा, DC कडून मैदानात उतरलेल्या रॉबिनने 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा, VIDEO

सध्या दुबईत T20 लीग सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉबिथ उथाप्पाची बॅट चांगलीच तळपतेय. तो खोऱ्याने धावा करतोय. मागच्यावर्षी रॉबिन उथाप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

Robin uthappa: दुबईत उथाप्पाच्या बॅटचा तडाखा, DC कडून मैदानात उतरलेल्या रॉबिनने 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा, VIDEO
Robin uthappaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:35 AM

दुबई: सध्या दुबईत T20 लीग सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉबिथ उथाप्पाची बॅट चांगलीच तळपतेय. तो खोऱ्याने धावा करतोय. मागच्यावर्षी रॉबिन उथाप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आता त्याने दुबईत फोर-सिक्सचा पाऊस पाडला. 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. इतकी आक्रमक बॅटिंग करुनही रॉबिन उथाप्पा आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. रॉबिथ उथाप्पा सध्या दुबई कॅपिटल्सकडून इंटरनॅशनल टी 20 लीग खेळतोय. तो लीगमध्ये आतापर्यंत दोन मॅच खेळलाय. या दोन्ही सामन्यात त्याने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिलीय. दुबईत खेळण्याआधी मागच्यावर्षी आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.

दाखवून दिली बॅटची ताकत

हे सुद्धा वाचा

सीएसकेकडून खेळल्यानंतर रॉबिथ उथाप्पा थेट दुबईत जाऊन मैदानात उतरला. दोन्ही सामन्यात त्याने आपल्या बॅटची धार अजूनही कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. दुबई कॅपिटल्ससाठी पहिल्या सामन्यात तो 43 धावांची इनिंग खेळला होता.

View this post on Instagram

A post shared by ILT20 On Zee (@ilt20onzee)

दमदार खेळूनही दुबई कॅपिटल्सचा पराभव

दुसऱ्या सामन्यातही रॉबिन उथाप्पाने आपला क्लास दाखवला. गल्फ जायंट्स विरुद्ध 46 चेंडूत 79 धावा फटकावल्या. उथाप्पाने 52 धावा अवघ्या 12 चेंडूत फटकावल्या. त्याने 10 चौकार आणि 2 सिक्स लगावले. इतकी वेगवान खेळी करुनही रॉबिन उथाप्पा आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुबई कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव झाला. उथप्पावर जेम्स विंस पडला भारी

दुबई कॅपिटल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात जायंट्सने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 183 धावा केल्या. कॅपिटल्सकडून उथाप्पाशिवाय कॅप्टन रोव्हमॅन पॉवेलने 38 आणि सिकंदर रजाने नाबाद 30 धावा केल्या. जायंट्सकडून कॅप्टन जेम्स विंसने नाबाद 83आणि इरास्मुसने 52 धावा ठोकून टीमला विजय मिळवून दिला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.