IPL 2023 : एक विकेट नाही, धावा नाही, मग कुठल्या कामाचे मिळाले 14 कोटी रुपये?

IPL 2023 News : उलट त्याने 8 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिल्या. या खेळाडूकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा आहेत. पण पहिल्या दोन सामन्यात त्याला लौकीकाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही.

IPL 2023 : एक विकेट नाही, धावा नाही, मग कुठल्या कामाचे  मिळाले 14 कोटी रुपये?
IPL 2023Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 2:03 PM

IPL 2023 News : IPL च्या ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो. खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या. आता आम्ही ज्या खेळाडूंबद्दल बोलत आहोत, त्याच यावेळच्या ऑक्शनशी काही देणंघेणं नाहीय. कारण त्या प्लेयरला रिटेन केल्यामुळे यंदाच्या ऑक्शनमध्ये तो उतरला नाही. दीपक चाहरबद्दल आम्ही बोलतोय. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं. दुखापतीमुळे तो आयपीएल 2022 च्या एका मॅचमध्ये खेळू शकला नाही. आता आयपीएल 2023 मध्ये त्याची कामगिरी त्याला मिळालेल्या पैशाच्या आस-पासही नाहीय.

IPL 2023 च्या सलग दुसऱ्या सामन्यात दीपक चाहर विकेट घेण्यात अपयशी ठरला. फलंदाजीत अजून त्याला संधी मिळालेली नाही. पण गोलंदाजीत त्याने टीमसाठी चांगली कामगिरी करण्याऐवजी वाट लावली. दीपक चाहर आपल्या क्षमतेनुसार, प्रदर्शन करण्यात कमी पडलाय.

8 ओव्हरमध्ये दिल्या तब्बल इतक्या धावा

दीपक चाहर आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळलाय. या दोन सामन्यात त्याने 8 ओव्हर बॉलिंग करताना 84 धावा दिल्या आहेत. म्हणजे त्याची इकॉनमी 10 पेक्षा जास्त आहे. दीपक चाहरला अजून एक विकेट घेता आलेला नाही. आयपीएलच्या पीचवर चाहर आपल्या किफायती गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याशिवाय पावरप्लेमध्ये तो नव्या चेंडूने विकेट घेण्यात माहीर आहे. चाहर या दोन्ही मॅचमध्ये अपयशी ठरलाय.

धोनी त्याला बाहेर बसवेल

IPL 2023 सुरु होण्याआधी दीपक चाहर दुखापतीपासून स्वत:ला वाचवत होता. त्याचा विचार चांगला होता. पण परफॉर्मन्सच गणित ट्रॅकवर आलं नाही, तर इंजरीपासून स्वत:ला वाचवण्याचा काही उपयोग होणार नाही. कॅप्टन धोनी खराब परफॉर्मन्समुळे त्याला बाहेर जरुर बसवू शकतो. LSG विरुद्ध सर्वात जास्त वाइड चेंडू

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दुसऱ्या सामन्यात दीपक चाहरने 4 ओव्हरमध्ये 55 धावा दिल्या. या दरम्यान त्याला विकेट मिळाला नाही. त्याने 5 वाइड चेंडू टाकले. लखनौ विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या बॉलर्सनी 13 वाइड बॉल टाकले. यात सर्वात जास्त वाइड चेंडू चाहरने टाकले.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.