IPL 2021 : मुंबईविरोधात आज चेन्नईकडून फाफ डुप्सेसी खेळणार की नाही?, मोठी अपडेट समोर, सॅम करन बाहेर!
पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात येणार आहे. याच मॅचबाबत चेन्नई संघातून मोठी अपडेट आली आहे.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व आजपासून पुन्हा सुरु होत आहे. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात येणार आहे. याच मॅचबाबत चेन्नई संघातून मोठी अपडेट आली आहे. नुकताच क्वारन्टाईन पिरियड पूर्ण केलेल्या डुप्लेसिसबद्दल आजची मॅच खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याचबद्दल चेन्नईच्या सीईओ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तो सध्या फिट आहे परंतु मॅच सुरु व्हायच्या अगोदर त्याच्या खेळण्याबाबत निर्णय केला जाईल, असं काशी विश्वनाथन यांनी सांगितलं. तर चेन्ननईकडून आज सॅम करन खेळणार नाहीय.
डु प्लेसिस आजचा सामना खेळेल की नाही याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ड्यू प्लेसिस CSK च्या सराव सत्रात चांगला खेळताना दिसला. पण, मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय सामन्यापूर्वी काही वेळ अगोदर घेतला जाईल. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी InsideSport.co ला सांगितले की, “डु प्लेसिस संघात सामील झाला आहे. क्वारन्टाईन पिरियड संपल्यानंतर त्याने सरावही केला आहे. सराव सत्रात त्याला त्रास झाला नाही. पण, सामन्यापूर्वी त्याच्या खेळण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ.”
डु प्लेसिस खेळणं चेन्नईसाठी फार महत्त्वाचं
चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट आहे की, फाफ डू प्लेसिस पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे. खरं तर, सीपीएल फायनलसह शेवटच्या 3 सामन्यांमध्ये दुखापतीमुळे डु प्लेसिसला वगळण्यात आले होते, त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खेळाबद्दल शंका निर्माण झाली. त्याला कंबरेला दुखापत झाली होती, त्यामुळे संकट आणखी गडद झाले की डुप्लेसिस चेन्नईसाठी किती काळ खेळणार नाही. CSK साठी डु प्लेसिस खेळणे अतिशय महत्त्वाचं आहे . तो या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यांत 320 धावा केल्या आहेत. याचदरम्यान त्याने 4 अर्धशतकं ठोकली आहेत.
सॅम करन बाहेर
याशिवाय, इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करन मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही, हे आधीपासूनच स्पष्ट आहे. दुखापतीमुळे नाही, तर सॅम करनचा क्वारन्टाईन पिरियड आणखू पूर्ण झालेला नाहीय.
(IPL 2021 Chennai Super Kings CEO Confirms decision on Inclusion of faf duplesis in playing XI sam curran out)
हे ही वाचा :
IPL 2021: विलगीकरणाचा कालावधी संपताच विराट कोहली मैदानात, एबी डिव्हिलीयर्ससोबत गळाभेटीचा VIDEO पाहाच