यंदा चेन्नईला IPL जिंकायचीय?, तर धोनीला करावा लागणार मोठा त्याग, या हुकमी एक्क्यावर दाखवावा लागणार भरोसा

आयपीएल 2021 च्या पहिला प्ले ऑफ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे 1 आणि 2 नंबरवर मध्ये आहेत. साखळी टप्प्यात दिल्लीने दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव केला होता पण प्लेऑफमध्ये खेळणं तितकसं सोपं नसेल.

यंदा चेन्नईला IPL जिंकायचीय?, तर धोनीला करावा लागणार मोठा त्याग, या हुकमी एक्क्यावर दाखवावा लागणार भरोसा
एमएस धोनी
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:40 PM

मुंबई : आयपीएल 2021 च्या पहिला प्ले ऑफ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे 1 आणि 2 नंबरवर मध्ये आहेत. साखळी टप्प्यात दिल्लीने दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव केला होता पण प्लेऑफमध्ये खेळणं तितकसं सोपं नसेल. चेन्नईला सातत्याने प्लेऑफमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ 11 व्या वेळी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तसेच, आठ वेळा अंतिम सामना खेळण्याचा अनुभव यलो आर्मीला आहे. दिल्लीही गेल्या तीन हंगामांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचत आहे. यावेळी संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे जो प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

धोनीअगोदर जाडेजाने बॅटिंग करायला हवी, आकडेवारी तर तसंच सांगते!

पण चेन्नई सुपर किंग्जला दिल्लीविरुद्ध प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागेल. यातील सर्वात महत्वाचं म्हणजे रवींद्र जडेजाचा फलंदाजीचा क्रमांक. डावखुरा जाडेजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 145.51 च्या स्ट्राईक रेटने 2267 धावा केल्या आहेत. त्याला संधी मिळालेल्या सर्व सामन्यांमध्ये तो फिनिशरची भूमिका चोख बजावत आहे. पण गेल्या काही सामन्यांमध्ये असे दिसून आले आहे की महेंद्रसिंग धोनी त्याच्या वर फलंदाजी करायला आला आहे. या हंगामात धोनी फलंदाजीत अपयशी ठरला आहे. त्याचा स्ट्राइक रेट फक्त 95.04 आहे आणि तो 96 धावा करू शकला आहे. अशा स्थितीत, जाडेजाने जर धोनीच्या अगोदर बॅटिंग केली तर चेन्नईचा स्कोअर वाढायला मदत होईल. आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत जडेजाने केवळ 156 चेंडूंचा सामना केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की जाडेजाला खेळायला पुरेपूर वेळ भेटलेला नाहीय.

दिल्ली आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीची स्लो बॅटिंग चेन्नईच्या मुळावर

आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्लीची शेवटची मॅच झाली त्यात प्रथम फलंदाजी खेळताना चेन्नईने पाच गडी बाद 136 धावा केल्या. यामध्ये धोनीने 27 चेंडू खेळून फक्त 18 धावा केल्या. सरतेशेवटी, संघाच्या खराब कामगिरीनंतर चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीने तीन गडी राखून सामना जिंकला. जर त्या सामन्यात जाडेजाने धोनीच्या बॅटिंग केली असती तर कदाचित CSK ची धावसंख्या जास्त झाली असती आणि सामन्याचा निकालही बदलू शकला असता. असाच खेळ पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाला. त्या सामन्यातही धोनीने 15 चेंडू खेळल्यानंतर 12 धावाच केल्या. आता ही स्पर्धा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. अशी संथ फलंदाजी संघांचं मोठं नुकसान करु शकते. चेन्नईने जिंकलेल्या सर्व सामन्यांमध्ये, त्यांच्या टॉप ऑर्डरने चांगला खेळ केला आहे. ऋतुराज गायकवाड (533) आणि फाफ डु प्लेसिस (546) दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पण उर्वरित फलंदाजांमध्ये फक्त जडेजाच फॉर्ममध्ये आहे.

अशा स्थितीत पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला जुन्या चुका पुन्हा करायची परवानगी नसेल. तरच लिलावापूर्वी चेन्नई पुन्हा एकदा आयपीएलचं जेतेपद मिळवू शकते.

(IPL 2021 CSK vs DC Ravindra Jadeja Should bat before MS Dhoni)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नई की दिल्ली, फायनलमध्ये पहिल्यांदा कोण एन्ट्री करणार? या 5 खेळाडूंच्या हातात सामन्याचा निकाल!

IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.