IPL 2021 : रिषभ पंतने अमित मिश्राला बोलिंगसाठी बोलवलं पण अंपायर्सनी थांबवलं, वाचा मैदानात नेमकं काय घडलं?
थर्ड अंपायर्सच्या सूचनेप्रमाणे मैदानी अंपायर्सने अमित मिश्राकडून स्वत:कडे बॉल घेतला. त्याला सॅनिटाईज केलं आणि अमित मिश्राला असा प्रकार पुन्हा करु नकोस म्हणून वॉर्निंग दिली. (IPL 2021 DC vs RCB Umpire Warning to Amit Mishra Over Saliva on Ball)
अहमदाबाद : जगभरात कोरोनाच्या संसर्गाने जोर धरलाय याला क्रिकेटचं मैदान तरी कसं अपवाद असेल… काही क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाली होती, त्यांनी आता कोरोनावर मात करत पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या या सगळ्या महाभयानाक वातावरणात क्रिकेटपटू बायो बबलमध्ये राहून आयपीएल (IPL 2021) खेळत आहे. अशावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने घालून दिलेले नियम पाळणं फार महत्त्वाचं बनलं आहे. दिल्ली विरुद्ध बंगळुरुच्या (DC vs RCB) सामन्यात अमित मिश्राने (Amit mishra) नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळताच अंपायर्सने त्याला बोलिंग करण्यापासून थांबवलं. त्याला वॉर्निंग दिली, त्यानंतर बॉल सॅनिटायईज केला आणि मग त्याच्या हाती बॉल सोपवून बोलिंग टाकण्यास सांगितलं. (IPL 2021 DC vs RCB Umpire Warning to Amit Mishra Over Saliva on Ball)
मैदानात नेमकं काय घडलं…?
दिल्ली विरुद्ध बंगळुरु या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सातव्या ओव्हरमध्ये बोलिंगसाठी अमित मिश्राला बोलवलं. ओव्हरचा पहिला बॉल टाकण्याअगोदर त्याने बॉलवर थुंकी लावली. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बॉलवर थुंकी लावण्यास मनाई आहे. थर्ड अंपायर्सच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ मैदानी अंपायर्सच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली.
मैदानी पंचांनी अमित मिश्राला बोलिंग करण्यापासून थांबवलं
थर्ड अंपायर्सच्या सूचनेप्रमाणे मैदानी पंचांनी अमित मिश्राकडून स्वत:कडे बॉल घेतला. त्याला सॅनिटाईज केलं आणि अमित मिश्राला असा प्रकार पुन्हा करु नकोस म्हणून वॉर्निंग दिली. अमित मिश्राने देखील नकारार्थी मान डोलवली आणि खेळ पुन्हा सुरु झाला.
— pant shirt fc (@pant_fc) April 27, 2021
आयसीसीचा नियम काय?
आयसीसीच्या नियमाप्रमाणे कोरोना संसर्गाच्या काळात बोलर्सला बोलिंग टाकताना बॉलला थुंकी लावता येणार नाही. जर बोलर्सने असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पहिलील वॉर्निंग दिली जाईल. जर पुन्हा बोलर्सकडून असा प्रकार घडला तर टीमला 5 रन्सची पेनल्टी लावली जाईल. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा महिने अतिशय कडक नियम करण्यात आले आहेत. खेळाडूंना या नियमाच्या अधिन राहून क्रिकेट खेळावं लागत आहे.
(IPL 2021 DC vs RCB Umpire Warning to Amit Mishra Over Saliva on Ball)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
IPL 2021 : डिव्हिलियर्सची दिल्लीविरुद्ध तुफानी खेळी, डेव्हिड वॉर्नर म्हणतो, ‘माझा आयडॉल…!’