MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 12 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. यासह मुंबई गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 10:16 PM

दुबई : IPL 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावलेला मुंबईचा संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासून वंचित राहिल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण आजच्या निर्णायक सामन्यात दिल्लीने मुंबईवर मात केली आहे. आयपीएलमध्ये आज उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला. (IPL 2021 : Delhi Capitals Beat Mumbai Indians By 4 Wickets, MI’s path toward playoffs is difficult)

या विजयासह दिल्लीने प्लेऑफचं तिकीट कन्फर्म केलं होतं, सोबतचं आजच्या विजयामुळे दिल्लीचं टॉप 2 मधलं स्थान अधिक बळकट झालं आहे. तर मुंबईने आजचा सामना गमावल्याने त्यांच्या प्लेऑफच्या शक्यता कमी झाल्या आहेत. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला त्यांनी अवघ्या 129 धावांत रोखण्याचं काम केलं.

दिल्लीची चिवट फलंदाजी

त्यानंतर मुंबईने दिलेलं 130 धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक 33 धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने 26 धावा करुन आणि अखेरच्या षटकात रवीचंद्रन अश्विने 20 धावा करुन चांगली साथ दिली.

मुंबईच्या गोलंदाजांनीदेखील या सामन्यात नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून या सामन्याट ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पंड्या आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबईचा पहिला डाव

या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करु दिली नाही. मुंबईकडून या डावात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. याच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा जमवता आल्या नाहीत. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. नॉर्खिया आणि रवीचंद्रन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

आधी गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी, त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विनच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर विजय मिळवला.

मुंबईचा मार्ग खडतर

मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 12 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. यासह मुंबई गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. मुंबईने जरी पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळणं कठीण आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांमध्ये सर्वात वाईट रनरेट मुंबईचा आहे. त्यामुळे मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतीलच. सोबत इतर संघांच्या सामन्यांमधील गणितांवरही मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(IPL 2021 : Delhi Capitals Beat Mumbai Indians By 4 Wickets, MI’s path toward playoffs is difficult)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.