IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास

आयपीएल-2021 (IPL 2021) चा लीग टप्पा संपला आहे आणि रविवारपासून प्ले-ऑफ फेरीला सुरुवात झाली आहे. चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे,

IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा 'या' कर्णधारावर विश्वास
Dhoni, Pant, Morgan, Kohli
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 10:53 AM

मुंबई : आयपीएल-2021 (IPL 2021) चा लीग टप्पा संपला आहे आणि रविवारपासून प्ले-ऑफ फेरीला सुरुवात झाली आहे. चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, तीन वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज, दोन वेळा विजेतेपद पटकावणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आहे, तर कोलकात्याचे कर्णधारपद इऑन मॉर्गनकडे आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व युवा ऋषभ पंतकडे आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची कमान विराट कोहलीच्या हातात आहे. या चार कर्णधारांनी त्यांची टीम इथवर आणली आहे आणि आता त्यांचा संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकतो. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने या चार कर्णधारांबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. (IPL 2021: Dhoni, Pant, Morgan or Kohli, who is the number-1 captain, Gautam Gambhir told this special name)

गंभीरने सांगितले की, हे सर्व कशा प्रकारचे कर्णधार आहेत. गंभीरची गणना आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते कारण त्याच्या नेतृत्वाखाली कोलकात्याने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, कोलकाताचा विद्यमान कर्णधार इऑन मॉर्गनच्या कामगिरीने गंभीर फारसा प्रभावित झालेला नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला, “मॉर्गनचा दृष्टिकोन. मला माहित नाही कारण तो या संघाचा कर्णधार नाही, व्हिडिओ विश्लेषक (एनालिस्ट) या संघाचे कर्णधारपद सांभाळतो. मॉर्गन नेहमी व्हिडिओ विश्लेषकांकडे पाहतो त्यामुळे मला माहित नाही की मैदानावर उपस्थित असलेला मॉर्गन कर्णधार आहे की कर्णधारपद मैदानाबाहेरुन सांभाळले जात आहे.

कोहलीच्या नेतृत्वाबाबत केलं भाष्य

विराटच्या नेतृत्वाने गंभीर प्रभावित झाला आहे. तो म्हणाला, “विराटने कर्णधार म्हणून शानदार कामगिरी बजावली आहे. खरं सांगायचं तर मला त्याची कॅप्टन्सी पूर्वी आवडत नव्हती. पण यावेळी त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. याचे कारण कदाचित त्याला माहित असेल की, कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा हंगाम आहे. म्हणूनच त्याला शक्य तितका आनंद घ्यायचा आहे. तो रिलॅक्स आहे आणि यावेळी त्याच्याकडे चांगले गोलंदाज आहेत.”

पंत आणि धोनीबाबत गंभीर म्हणतो…

पहिल्या क्वालिफायरमध्ये पंतच्या दिल्लीचा सामना धोनीच्या चेन्नईशी झाला, यात धोनीच्या चेन्नईने दिल्लीवर मात केली. धोनी आणि पंत या दोघांच्या कर्णधारपदाबद्दल गंभीर म्हणाला, “कर्णधारपदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितपणे जो खेळाडू दबाव चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, तोच उत्तम ठरतो, असा कर्णधार धोनीच आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू आहेत याचा त्याला चांगला फायदा मिळतोय. स्टीव्ह स्मिथ प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळला तर त्याला त्याचा फायदा मिळेल. त्यांच्याकडे रविचंद्रन अश्विन आहे ज्याने आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. म्हणूनच माझ्यासाठी सध्या धोनी नंबर 1 कर्णधार आहे.

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(IPL 2021: Dhoni, Pant, Morgan or Kohli, who is the number-1 captain, Gautam Gambhir told this special name)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.