Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका

आयपीएलमध्ये इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स राखून धुव्वा उडवला. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात मुंबईचा हा दुसरा पराभव तर कोलकाताचा दुसरा विजय ठरला.

Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका
Eoin Morgan KKR
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 8:54 AM

IPL 2021 यूएई : आयपीएलमध्ये इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स राखून धुव्वा उडवला. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात मुंबईचा हा दुसरा पराभव तर कोलकाताचा दुसरा विजय ठरला. या विजयामुळे कोलकाताने प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे. काल 23 तारखेला झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) सोपा विजय मिळवला.

कोलकाताने सोपा विजय मिळवला असला तरी कर्णधार इऑन मॉर्गनला (Eoin Morgan) मोठा फटका बसला आहे. कारण मॉर्गनला थोडा थोडका नाही तर तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मोठ्या विजयानंतरही मोठा दंड ठोठावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकंच नाही तर कोलकाताच्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी किमान 6 लाख रुपयांचा फटका बसला.

स्लो ओव्हर रेटमुळे कोलकाताला हा दंड ठोठावण्यात आला. षटकांची गती न राखल्यामुळे कर्णधारासह संपूर्ण टीमला भुर्दंड बसला. एरव्ही स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड ठोठावला जातो. पण इऑन मॉर्गनला तब्बल 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचं कारण म्हणजे स्लो ओव्हर रेटची चूक KKR ने एकदा नाही तर दुसऱ्यांदा केली आहे. त्यामुळे त्यांना दुप्पट दंड ठोठावण्यात आला.

KKR ची टॉप 4 मध्ये धडक

दरम्यान, KKR ने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन, पॉईंट टेबलमध्येही आगेकूच केली आहे. आयपीएलच्या पाईंट टेबलमध्ये कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स, मग चेन्नई सुपर किंग्ज आणि तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचा नंबर आहे.

मुंबई इंडियन्सचा पराभव

कोलकाता विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना KKR ने एकहाती जिंकला. नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर मुंबईकडून सलामीवीर रोहित आणि डिकॉकने उत्तम सुरुवात केली. पण रोहित बाद होताच नंतरच्या फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. केवळ डिकॉकने अर्धशतक झळकावल्यामुळे मुंबई 155 धावांपर्यंत मजल मारु शकली. मग 156 धावांचं आव्हान घेऊन केकेआर मैदानात उतरली. ज्यानंतर युवा फलंदाज अय्यर आणि त्रिपाठी यांनी अर्धशतकं ठोकत संघाला एक सोपा आणि मोठा असा 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

IPL Point Table 

संबंधित बातम्या 

MI vs KKR Live Score, IPL 2021 : केकेआरचा दमदार विजय, मुंबईला 7 गडी राखून चारली धुळ

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.