IPL 2021 : भारताता खोऱ्याने धावा जमवणारा धोनीचा धुरंदर UAE च्या मैदानांवर अपयशी, CSK चं टेन्शन वाढलं
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने यावेळी धमाका केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेसाठी मागील हंगाम सर्वात निराशाजनक होता.
दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने यावेळी धमाका केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेसाठी मागील हंगाम सर्वात निराशाजनक होता. आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीचा सीएसके संघ 2020 च्या हंगामात लीगमधून सर्वात आधी बाहेर पडला होता. पण IPL 2021 मध्ये CSK ने जबरदस्त पुनरागमन केले आहे. सीएसकेने भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात चांगली सुरुवात केली आणि यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातही संघ चमकत राहिला. पण सीएसकेच्या एका दिग्गज फलंदाजाचा रंग यूएईच्या मैदानावर फिका पडू लागला आहे. त्याने भारतीय खेळपट्ट्यांवर खोऱ्याने धावा केल्या, मात्र यूएईमध्ये तो एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) असे या फलंदाजाचे नाव आहे. (IPL 2021 : Faf du Plessis failed in UAE, raising CSK’s concerns)
फाफ डू प्लेसिस CSK च्या सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. चेन्नईच्या यशात त्याचे मोठे योगदान आहे. डू प्लेसिसने या मोसमातही अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आणि त्यात 470 धावा केल्या आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतात त्याच्या बॅटमधून जितक्या धावा निघाल्या, तसा तो यूएईमध्ये चमकलेला नाही. त्याची बॅट यूएईच्या मैदानावर त्या शैलीत चालली नाही.
युएईच्या खेळपट्टीवर डु प्लेसिसचा संघर्ष
आयपीएल 2021 चा पहिला टप्पा भारतीय मैदानावर खेळला गेला. जिथे डु प्लेसिसने त्याच्या खूप धावा केल्या होत्या. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळल्या गेलेल्या सात डावांमध्ये डुप्लेसिसच्या बॅटमधून 320 धावा निघाल्या. त्याने 145.45 च्या स्ट्राईक रेटने चार अर्धशतके देखील केली. तर त्याने यूएईमध्ये आतापर्यंत 6 डाव खेळले आहेत आणि त्यात तो केवळ 150 धावा जमवू शकला आहे. येथे त्याचा स्ट्राइक रेट देखील 122.95 वर आला आहे आणि त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेलं नाही. या हंगामातील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 95 इतकी होती.
सीएसकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता
सीएसके टीम गेल्या हंगामात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती, पण 2020 च्या आयपीएल हंगामात शेवटचे तीन सामने जिंकले. त्यांना 14 सामन्यांत एकूण 6 विजय मिळवता आले. गेल्या हंगामात सीएसकेची कामगिरी बरीच निराशाजनक होती. मात्र या हंगामात सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. आयपीएल आता अंतिम फेरीत प्रवेश करत असल्याने, युएईच्या भूमीवर डु प्लेसिसच्या बॅटने धावा न आल्यास सीएसकेच्या अडचणी वाढू शकतात.
इतर बातम्या
IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड
IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल
(IPL 2021 : Faf du Plessis failed in UAE, raising CSK’s concerns)