IPL Final 2021 KKR vs CSK Live Streaming: चेन्नईविरुद्ध कोलकाता रंगणार महामुकाबला, कोण घालणार जेतेपदाचं ताज, कुठे, कधी, कशी पाहणार मॅच?

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झाल्यानंतरही सुरळीत पार पडलेलं आयपीएल 2021 हे पर्व आता संपत आहे. आज अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांच्यात पार पडणार आहे.

IPL Final 2021 KKR vs CSK Live Streaming: चेन्नईविरुद्ध कोलकाता रंगणार महामुकाबला, कोण घालणार जेतेपदाचं ताज, कुठे, कधी, कशी पाहणार मॅच?
सीएसके विरुद्ध केकेआर
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 4:20 PM

IPL 2021 : बहुप्रतिक्षीत अशा इंडियन प्रीमियर लीग 2021 ची आज सांगता होणार आहे. आज स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) या दोघांमध्ये खेळवला जाणार आहे.  या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघानी कसून तयारी केली असून नेमका विजेता कोण? या उत्तराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दोन्ही संघाकडे अप्रतिम फॉर्ममधले खेळाडू आहे. पर्वाच्या सुरुवातीपासून चेन्नईने आपल्या नावाप्रमाणे दमदार खेळ दाखवला आहे. केकेआरचा संघ मात्र दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला गुणतालिकेत अगदी खाली होता. पण मागील काही सामन्यात अगदी जादूई खेळ दाखवत केकेआर संघाने थेट अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली आहे. सध्या केकेआरचे फलंदाज खास फॉर्ममध्ये नसले तरी गोलंदाज मात्र धमाकेदार खेळ करत आहेत.  दोन्ही संघासाठी आजच्या सामन्याचा विचार करता चेन्नईला केकेआरचं फिरकीपटूंचं त्रिकुट चक्रवर्ती, नारायण आणि शाकिब यांच्यापासून सर्वाधिक धोका आहे. तर केकेआरचा कर्णधार मॉर्गन आणि कार्तिक यांचा खराब फॉर्म हा सर्वात मोठा धोका आहे.

आयपीएलचा अंतिम सामना कुठे खेळला जाईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स हा आयपीएल 2021 चा अंतिम सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना किती वाजता सुरू होईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या सामन्याचं स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होईल. तर हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग असेल.

IPL 2021 Final साठी केकेआरचा संभाव्य अंतिम 11 – व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक,  नितीश राणा, राहुल त्रिपाठी, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शिवम मावी.

IPL 2021 Final साठी सीएसकेचा संभाव्य अंतिम 11 – फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर..

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

(IPL 2021 Final kolkata knight Riders vs Chennai Superking live Streaming When And Where To watch Online Free in marathi)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.