IPL 2021 : एलिमिनेटर सामन्याआधी 2 स्टार खेळाडूंनी सोडली RCB ची साथ, विराटसेना अडचणीत
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल. पण या सामन्यापूर्वी संघातील दोन मोठे खेळाडू संघ सोडून निघून गेले आहेत.
दुबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल. पण या सामन्यापूर्वी संघातील दोन मोठे खेळाडू संघ सोडून निघून गेले आहेत. हे दोन्ही खेळाडू आता आयपीएल 2021 मध्ये आरसीबीचा भाग नसतील. यूएईमध्ये आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी त्यांना संघात घेतले होते. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुश्मंता चमीरा (Dushmantha Chameera) अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. टी 20 विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. अशा स्थितीत दोघांनाही आरसीबीच्या बायो बबलमधून मुक्त करण्यात आले आहे. आरसीबीने ट्विट करून ही माहिती दिली. (IPL 2021: Hasaranga, Dushmantha Chameera released by RCB ahead of Eliminator, to join Sri Lanka national team)
वानिंदू हसरंगा याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तो आरसीबीपासून वेगळा झाल्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला, “प्ले ऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला शुभेच्छा. सर्व सहकाऱ्यांचे आणि परिवाराचे मनापासून आभार. कदाचित या वर्षी आम्ही ट्रॉफी जिंकू. हा अनुभव अद्भुत होता. टीम मॅनेजमेंटपासून इतर सर्व काही चांगले होते. येथे आपण सगळे बंधुत्व आणि मैत्रीचे नाते निभावत खेळतो. या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे.”
हसरंगा आणि चामीरा रिप्लेसमेंट म्हणून संघात आले होते
वानिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिरा यांना आरसीबीने आयपीएल 2021 मध्ये बदली खेळाडू म्हणून निवडले होते. त्याने अॅडम झांपा आणि केन रिचर्डसन सारख्या खेळाडूंची जागा घेतली होती. चमीराला एकही सामना खेळता आला नाही. तर हसरंगा दोन सामने खेळला पण त्यात तो काही विशेष करू शकला नाही. त्याच्या पहिल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो एक धाव करुन नाबाद राहिला. गोलंदाजीतही तो काही कमाल करु शकला नाही, दोन्ही सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
वानिंदू हसरंगा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो लेग स्पिन गोलंदाजी करण्यासाठी तसेच खालच्या क्रमांकावर उपयुक्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आयपीएलमध्ये असे काही घडले नाही. पुढील आयपीएलमध्ये त्याच्यावर कोणता संघ बोली लावतो हे पाहावे लागेल.
इतर बातम्या
The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश
DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!
(IPL 2021: Hasaranga, Dushmantha Chameera released by RCB ahead of Eliminator, to join Sri Lanka national team)