या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकामुळे आणि ड्वेन ब्राव्होच्या झटपट वादळी खेळीच्या जोरावर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने याच दोन्ही फलंदाजांना विजयाचं श्रेय दिलं.

या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया
MS Dhoni
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 1:24 PM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकामुळे आणि ड्वेन ब्राव्होच्या झटपट वादळी खेळीच्या जोरावर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने याच दोन्ही फलंदाजांना विजयाचं श्रेय दिलं. चेन्नईची अवस्था खराब असताना अपेक्षेपेक्षा जास्त स्कोअर करुन देण्यात दोन्ही फलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला, असं धोनी म्हणाला.

धोनीकडून विजयाचं श्रेय 2 खेळाडूंना

आमचा संघ संकटात सापडलेला असताना पहिल्यांदा ऋतुराजने डाव सावरला. सेट झाल्यानंतर त्याने आक्रमण केलं. त्याने खूप सुंदर फलंदाजी केली. पीचवर स्थिरावल्यावर ऋतुराजने आक्रमक फटकेही खेळले. शेवटच्या काही ओव्हरमध्ये ब्राव्होनेही ऋतुराजला उत्तम साथ दिली. दोघांमुळे आम्ही सन्मानजनक धावसंख्या उभा करु शकलो आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केल्याने मुंबईचा पराभव करणं शक्य झालं, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

चेन्नईच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ढेपाळला. ड्वेन ब्राव्हो (25 धावांत 3) आणि दीपक चाहर (19 धावांत 2) यांच्या धारदार गोलंदाजीसमोर मुंबई आठ बाद 136 धावाच करु शकली. मुंबईकडून सौरभ तिवारीने अर्धशतक नोंदवलं. त्याने 40 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी करताना 5 चौकार लगावले.

दोन तुल्यबळ संघांमध्ये अटीतटीचा सामना अपेक्षित होता, मात्र मॅच अगदी एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे होती. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

दुबईत ऋतु’राज’

ऋतुराजने 58 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 88 धावा चोपल्या, त्याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. 40 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. मुंबईचे दोन महत्त्वाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांवरही गायकवाडने प्रहार केला. मातब्बर गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढत गायकवाडने दुबईत दबंगगिरी केली. तर ऋतुराजला ब्राव्होनेही सुंदर साथ दिली. ब्राव्होने 8 चेंडूत 23 धावा फटकावल्या. त्याने लागोपाठ 3 षटकार खेचत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या हाणामारीच्या षटकात ऋतुराज-ब्राव्हो जोडीने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली.

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ डुप्लेसी आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाले. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले.

मुंबईचे फलंदाज ‘FAIL’

मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. जे त्यांच्यासारख्या दिग्गज संघासाठी तितके अधिक नव्हते. पण कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

हे ही वाचा :

IPL 2021 : पराभवानंतर मुंबईला आणखी एक धक्का, रोहित शर्मा दुखापतग्रस्त, पुढच्या सामन्यांनाही मुकणार?

ऋतुराज गायकवाडची दुबईत दबंगगिरी, बोल्ट-बुमराहची धुलाई करत मुंबईला नमवलं

IPL 2021: धोनीचे धुरंदर मुंबईवर भारी, ऋतुराजच्या आक्रमक खेळीसह 20 धावांनी विजय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.