IPL 2021 Final : चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोण ठरेल वरचढ, आकडेवारी काय सांगते?

सीएसकेची 12 हंगामातील ही 9 वी फायनल आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011 आणि 2018 मध्ये ट्रॉफी जिंकली, तर केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.

IPL 2021 Final : चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोण ठरेल वरचढ, आकडेवारी काय सांगते?
csk vs kkr match preview
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 2:37 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग 2021 ची आज सांगता होणार आहे. आज स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) या दोघांमध्ये खेळवला जाणार आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघानी कसून तयारी केली असून नेमका विजेता कोण? या उत्तराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आयपीएल 2021 चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल. (Ipl 2021 MS Dhoni Chennai Super Kings Vs Eoin Morgan kolkata knight riders, who will prevail)

दोन्ही संघाकडे अप्रतिम फॉर्ममधले खेळाडू आहे. पर्वाच्या सुरुवातीपासून चेन्नईने आपल्या नावाप्रमाणे दमदार खेळ दाखवला आहे. केकेआरचा संघ मात्र दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला गुणतालिकेत अगदी खाली होता. पण मागील काही सामन्यात अगदी जादूई खेळ दाखवत केकेआर संघाने थेट अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली आहे. सध्या केकेआरचे फलंदाज खास फॉर्ममध्ये नसले तरी गोलंदाज मात्र धमाकेदार खेळ करत आहेत. दोन्ही संघासाठी आजच्या सामन्याचा विचार करता चेन्नईला केकेआरचं फिरकीपटूंचं त्रिकुट चक्रवर्ती, नारायण आणि शाकिब यांच्यापासून सर्वाधिक धोका आहे. तर केकेआरचा कर्णधार मॉर्गन आणि कार्तिक यांचा खराब फॉर्म हा सर्वात मोठा धोका आहे.

दोन्ही संघ एका पेक्षा एक

सीएसकेची 12 हंगामातील ही 9 वी फायनल आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011 आणि 2018 मध्ये ट्रॉफी जिंकली, तर केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले. केकेआरची ही तिसरी फायनल आहे. कोलकात्याने 2012 मध्ये CSK ला हरवून पहिले विजेतेपद पटकावले आणि शुक्रवारी पुन्हा एकदा दोन्ही संघ जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने येतील. सीएसकेने क्वालिफायर 1 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने

आजच्या सामन्यात दोन विश्वचषक विजेते कर्णधार आमने-सामने उभे ठाकले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011 साली विश्वचषक उंचावला होता. तर कोलकात्याचा कर्णधार ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे आजच्या विजयासह चेन्नई विजयाचा चौकार लगावण्याच्या तयारीत असणार आहे. तर कोलकात्यानेदेखील दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे तिसऱ्या चषकासाठी कोलकात्याने जोरदार तयारी सुरु केली आहे.

IPL 2021 Final साठी केकेआरची संभाव्य प्लेईंग 11 – व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, ऑईन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शिवम मावी.

IPL 2021 Final साठी सीएसकेची संभाव्य प्लेईंग 11 – फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.

कोणता किती वेळा आयपीएल चॅम्पियन बनला?

  1. मुंबई इंडियन्स – कर्णधार रोहित शर्मा 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020)
  2. चेन्नई सुपर किंग्ज – कर्णधार महेंद्रसिंग धोनी 3 वेळा (2010, 2011 आणि 2018)
  3. कोलकाता नाईट रायडर्स – कर्णधार गौतम गंभीर 2 वेळा (2012 आणि 2014)
  4. सनरायझर्स हैदराबाद – 1 वेळ (2016) कर्णधार डेव्हिड वॉर्नर
  5. डेक्कन चार्जर्स – 1 वेळ (2009) कॅप्टन अॅडम गिलख्रिस्ट
  6. राजस्थान रॉयल्स – 1 वेळ (2008) कर्णधार शेन वॉर्न

2008 ते 2020 चॅम्पियन्स संघांची यादी

  • 2008: राजस्थान रॉयल्स (चेन्नईवर 3 गडी राखून विजय)
  • 2009: डेक्कन चार्जर्स (बंगळुरूचा 6 धावांनी पराभव)
  • 2010: चेन्नई सुपर किंग्ज (मुंबईचा 22 धावांनी पराभव)
  • 2011: चेन्नई सुपर किंग्ज (बंगळुरूचा 58 धावांनी पराभव)
  • 2012: कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नईवर 5 गडी राखून विजय)
  • 2013: मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 23 धावांनी पराभव)
  • 2014: कोलकाता नाईट रायडर्स (पंजाबचा 3 गडी राखून पराभव)
  • 2015: मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 41 धावांनी पराभव)
  • 2016: सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरूचा 8 धावांनी पराभव)
  • 2017: मुंबई इंडियन्स (रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा 1 धावेने पराभव)
  • 2018: चेन्नई सुपर किंग्ज (सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव)
  • 2019 : मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 1 धावेने पराभव)
  • 2020: मुंबई इंडियन्स (दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव)

इतर बातम्या

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्याला सीएसकेचा दिग्गज खेळाडू मुकणार?, खराब फॉर्ममुळे संघ घेणार धक्कादायक निर्णय

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

PHOTO: आगामी T20 World Cup साठी सर्व देश रंगणार नव्या रंगात, जर्सीचा लूक व्हायरल

(Ipl 2021 MS Dhoni Chennai Super Kings Vs Eoin Morgan kolkata knight riders, who will prevail)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.