IPL 2021: MI vs CSK सामना सुरु होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, 8 षटकार उडवत मुंबईला इशारा, पाहा VIDEO
आयपीएलच्या उर्वरीत पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी दिग्गज संघ असणारे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग हे दोघेही आमने-सामने असणार आहेत.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मधूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व पुन्हा सुरु होत आहे. उर्वरीत 31 सामने युएईत आजपासून खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरुवातच भव्य अशा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) या सामन्याने होत आहे. या भव्य सामन्यापूर्वीच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आपला जलवा दाखवत सरावादरम्यान एका मागोमाग असे 8 षटकार ठोकल आहेत. धोनीच्या या सामन्यापूर्वीच्या अंदाजामुळे मुंबईच्या गोलंदाजाना घाम फुटणार हे नक्की.
धोनी यंदाची आयपीएल जिंकण्यासाठी संपूर्ण जीव ओतणार यात शंका नाही.मागील वर्षी खास कामगिरी न करु शकलेल्या धोनीच्या चेन्नई संघाने यंदा मात्र एक चांगली सुरुवात केली आहे. सामन्याआधीच सरावादरम्यान धोनीने क्रिजवर येत त्याचा या पर्वात कसा अंदाज असेल याची झलक दिली आहे. धोनीने सरावा दरम्यान कधी स्पिनर तर कधी पेसर अशा साऱ्यांचीच धुलाई केली. त्याने सरावा दरम्यान अनेकदा बॉल बाऊंण्ड्रीच्या बाहेर धाडला यात 8 वेळा तर त्याने षटकार ठोकले. हे सारं चेन्नई सुपरकिंगनेच त्यांच्या सोशल मीडियवर शेअर केलं असून धोनीच्या या व्हिडीओला चांगलेच लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.
धोनीचे धमाकेदार 8 षटकार
धोनीने ट्रेनिंगच्या दरम्यान उडवलेल्या 8 षटकारांमध्ये अधिक षटकार हे लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ या भागातच ठोकले. यावेळी एक षटकार त्याने त्याच्या प्रसिद्ध अशा हेलीकॉप्टर शॉटमध्ये देखील खेचला. या व्हिडीओवरुन धोनी आगामी सामन्यांसाठी सज्ज झाल्याचं स्पष्ट होत असून आता फक्त त्याला मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
All arealayum Thala…?#WhistlePodu #Yellove ?? @msdhoni pic.twitter.com/Zu85aNrRQj
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) September 18, 2021
दुबईचं मैदान चेन्नईसाठी फायदेशीर
चेन्नईचा आजचा सामना हा मुंबई इंडियन्स संघालविरुद्ध दुबईमध्ये आहे. दुबई असं मैदान आहे ज्यामध्ये मुंबई केवळ 3 वेळाच विजयी झाली आहे. तिन्ही वेळा केवळ दिल्ली समोरच हा विजय मिळवला असून आज चेन्नईसला मुंबई संघाला पराभूत करण्याची पूर्ण संधी आहे.
आतापर्यंत झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत दूसऱ्या स्थानालवर आहे. त्यांनी एकूण 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ हा चेन्नईपेक्षा थोडा पुढे असून चौथ्या स्थानावर विराजमाना आहे.
हे ही वाचा
IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी
(IPL 2021 MS Dhoni hit 8 sixes in csk training before MI vs CSK match)