IPL 2021, Point Table : मुंबई इंडियन्स टॉप 5 मधून बाहेर, पहिल्या डबल हेडरनंतर गुणतालिकेत बदल
पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या चार संघांमध्ये काल (शनिवारी) दोन सामने खेळवण्यात आले.
नवी दिल्ली : पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या चार संघांमध्ये काल (शनिवारी) दोन सामने खेळवण्यात आले. काल आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिले डबल हेडर सामने खेळवण्यात आले. या सामन्यांच्या निकालानंतर 5 वेळा आयपीएलचा किताब जिंकणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ टॉप 4 मधून बाहेर फेकला गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत नंबर 1 वर दाखल झाला आहे. (IPL 2021: Mumbai Indians out of top 5 in points table after first double header)
कोलकाता नाईट रायडर्सनेदेखील (केकेआर) प्लेऑफसाठी आपला दावा सादर केला आहे. पहिल्या दुहेरी सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी आणि पंजाबने हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला.
दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर
आयपीएल 2021 मध्ये काल अबू धाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी सोपा विजय मिळवला आहे. या विजयासाह दिल्लीने गुणतालिकेत 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तसेच प्लेऑफचं तिकीटदेखील कन्फर्म केलं आहे.
दुसऱ्या बाजूला 9 सामन्यांत 14 गुणांसह चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ 9 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
पंजाब किंग्सनेही यूएईमध्ये आपली कामगिरी सुधारली आणि प्लेऑफसाठीचे त्यांचे आव्हान जिवंत ठेवले. पंजाब 10 सामन्यांत 8 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स 9 सामन्यांत 8 गुणांसह 6 व्या स्थानावर ढकली गेली आहे. राजस्थान रॉयल्सचेही 9 सामन्यात 8 गुण असून ते 7 व्या स्थानावर आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद 9 सामन्यांत 2 गुणांसह गुणतालिकेच्या तळाशी आहेत.
इतर बातम्या
रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!
माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया
IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी
(IPL 2021: Mumbai Indians out of top 5 in points table after first double header)