IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा

पंड्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी केली नाही, कारण तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दरम्यान, हार्दिकने त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेट समीक्षकांना आश्वासन दिले आहे की, तो लवकरच गोलंदाजी करेल.

IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 3:00 PM

मुंबई: आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जसजसा जवळ येत आहे, तसं संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या फॉर्मची चर्चाही जोर धरु लागली आहे. यामध्येच सर्वांना चिंता लागून असलेला एक खेळाडू म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पंड्या (Hardik Pandya). दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर (MI vs PBKS) सहा गडी राखून विजय मिळवला. ज्या विजयात हार्दीकच्या धमाकेदार खेळीची झलक दिसली. त्याने 30 चेंडूत दमदार अशा नाबाद 40 धावा ठोकत सामना संपवला. ज्यामुळे त्याचा फॉर्म परत येत असल्याची हमीतर मिळाली पण अष्टपैलू पंड्या अद्यापही गोलंदाजी करत नसल्याने त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (IPL 2021 : Mumbai Indians star Hardik Pandya gives major update on his return in bowling)

या दरम्यान, हार्दिकने त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेट समीक्षकांना आश्वासन दिले आहे की, तो लवकरच गोलंदाजी करेल. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्याआधी ब्रॉडकास्टर बोलताना पंड्याने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ब्रॉडकास्टर दीप दासगुप्ता यांना सांगितले की, तो त्याच्या गोलंदाजीवर काम करत आहे. परंतु माजी क्रिकेटपटूने हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हार्दिक म्हणाला की, ‘प्रयत्न आणि मेहनत करतोय, लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल.

पंड्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी केली नाही, कारण तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सिरीजदरम्यान गोलंदाजी करताना हार्दिक दिसला होता. आगामी टी – 20 विश्वचषक स्पर्धेसाठी पंड्याची भारताच्या संघात निवड झाली आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा म्हणाले होते की, हार्दीक गोलंदाजी करेल.

आम्ही पंड्यावर जबरदस्ती करत नाही : जयवर्धने

दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा प्रशिक्षक महेला जर्यवर्धने (Mahela Jayawrdene) याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंड्याला सध्या गोलंदाजी करण्याकरता कोणतीच जबरदस्ती करण्यात येत नसल्याचं सांगत यामागील कारणही सांगितलं आहे.

महेलाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पंड्याच्या गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने सांगितलं, “हार्दिकने बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्याच्या संपूर्ण खेळावर आम्ही फार लक्ष देत आहोत. दरम्यान आगामी विश्वचषकात पंड्याने चांगली कामगिरी करावी, यासाठी त्याला कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली जात नसून संघासाठी सध्या त्याची फलंदाजी अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही त्याला गोलंदाजीसाठी फोर्स करत नाही.”

अन्यथा शार्दूलला संधी

हार्दीकने पंजाब विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. ज्यानंतर अनेक टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. पण आयपीएलच्या उर्वरीत सामन्यातही हार्दीकने अशीच कामगिरी करने महत्त्वाचे आहे. अन्यथा हार्दिकच्या जागी भारतीय संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची एन्ट्री होऊ शकते. सध्या राखीव खेळाडूंत नाव असलेल्या शार्दूलला थेट अंतिम भारतीय संघात स्थान मिळू शकतं. सध्या शार्दुल एकमेव भारतीय संघातील उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो फलंदाजीही उत्तम करतो.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी-20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

इतर बातम्या

RR vs CSK : जयसवालचं वादळ, दुबेची फटकेबाजी, राजस्थानचा चेन्नईवर दिमाखदार विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

विराट कोहलीनंतर भारताचं नेतृत्व कोणाकडे, डेल स्टेनचा ‘या’ चार खेळाडूंवर विश्वास

(IPL 2021 : Mumbai Indians star Hardik Pandya gives major update on his return in bowling)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.