IPL 2021: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला दुप्पट मार, आधी पराभव, मग दंड, कप्तान संजूचं मोठं नुकसान

दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे राजस्थानचा संघ निराश झालाच, पण त्यानंतर आणखी एक बातमी आली जी राजस्थानच्या खेळाडूंच्या निराशेत भरत घालेल.

IPL 2021: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला दुप्पट मार, आधी पराभव, मग दंड, कप्तान संजूचं मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 10:56 AM

अबू धाबी : आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी सोपा विजय मिळवला आहे. या विजयासाह दिल्लीने गुणतालिकेत 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तसेच प्लेऑफचं तिकीटदेखील कन्फर्म केलं आहे. (IPL 2021 : Rajasthan Royals fined for slow over rate against delhi capitals, Sanju Samsons big loss)

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलेलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. परिणामी राजस्थानचा संघ या सामन्यात निर्धारित 20 षटकात 121 धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे राजस्थानला 33 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्लीच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने या सामन्यात योगदान दिलं. नॉखियाने या सामन्यात सर्वाधिक 2 बळी घेतले. तर कगिसो रबाडा, आवेश खान, रवीचंद्नर अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे राजस्थानला 20 षटकात केवळ 121 धावाच जमवता आल्या.

या पराभवामुळे राजस्थानचा संघ निराश झालाच, पण त्यानंतर आणखी एक बातमी आली जी राजस्थानच्या खेळाडूंच्या निराशेत भरत घालेल. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राजस्थान संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थान संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.

राजस्थानचा पहिला डाव

तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि अवघ्या 21 धावांत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने काही वेळ किल्ला लढवला खरा परंतु दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. आधी रिषभ पंत 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिमरन हेटमायरने काही वेळ फटकेबाजी करुन दिल्लीला शतक पूर्ण करुन दिलं. मात्र त्यालाही फार वेळ मैदानात तग धरता आला नाही.

ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. दिल्लीने कसाबसा दिडशे धावांचा टप्पा पार केला. राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकरियाने 4 षटकांमध्ये अनुक्रमे 22 आणि 33 धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अखेर निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(IPL 2021 : Rajasthan Royals fined for slow over rate against delhi capitals, Sanju Samsons big loss)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.