IPL 2021 : या खेळाडूमुळे विराटचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं, RCB च्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन!

आयपीएल 2021 च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवाबरोबरच बंगळुरुचं यंदाच्या वर्षीही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शेवटच्या सामन्यात बंगळुरुचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळला. पण एका खेळाडूने सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं.

IPL 2021 : या खेळाडूमुळे विराटचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं, RCB च्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन!
Virat Kohli
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 8:29 AM

IPL 2021 :  आयपीएल 2021 च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवाबरोबरच बंगळुरुचं यंदाच्या वर्षीही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शेवटच्या सामन्यात बंगळुरुचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळला. पण एका खेळाडूने सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. त्याच खेळाडूने विराटच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आणि आरसीबीच्या पराभवाचा व्हिलन ठरला.

आरसीबीच्या एका खेळाडूमध्ये विराटचं स्वप्न भंगलं

आरसीबीच्या पराभवाचा सर्वात मोठा दोषी अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिश्चन ठरला. ख्रिश्चनने एकाच ओव्हरमध्ये धावांची खिरापत वाटली की त्यानंतर संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. केकेआरच्या डावातील बारावे षटक फेकण्यासाठी ख्रिश्चनने आला. या षटकात ख्रिश्चनचा सामना सुनील नरेनशी झाला. नारायणने ख्रिश्चनला एका षटकात तीन मोठे षटकार मारले आणि तिथेच सामना फिरला. ख्रिश्चनच्या या षटकात नारायणने एकूण 22 धावा फटकावल्या. केकेआरने बंगळुरुच्या हातातला विजय हिसकावून घेतला.

ख्रिश्चनच्या ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर नारायणने 3 सिक्सर ठोकून त्याची धुलाई केली. एकाच ओव्हरमध्ये 22 धावांची खिपारत वाटल्यानंतर आणि सामना हळूहळू बंगळुरुच्या हातून निसटतोय, हे पाहिल्यानंतर विराटचा चेहरा उतरला. यापाठीमागचं मुख्य कारण होतं विराटचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना आणि पुन्हा एकदा आयपीएल जेतेपदाची हुलकावणी…! बंगळुरुने शेवटपर्यंत केकेआरशी झुंज दिली पण ती झुंज अपयशी ठरली. अखेर कोलकात्याने बाजी मारत बंगळुरुला 4 विकेट्सने पराभव केलं.

विराटचं स्वप्न पुन्हा भंगलं

कोलकात्याने दणका दिल्याने पुन्हा एकदा विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. विराट गेल्या 13 वर्षांपासून आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण प्रत्येक वेळी त्याच्या वाट्याला पराभव येतो आहे. बंगळुरुने आतापर्यंत 3 वेळा अंतिम फेरीत धडक मारलीय. परंतु प्रत्येक वेळी विराटने इतर संघाच्या कर्णधारांना ट्रॉफी उंचावताना पाहिलं. यंदाच्या वर्षीही विराटचं स्वप्न तुटलं. आता कर्णधार म्हणून विराट ती ट्रॉफी कधीही उंचावताना दिसणार नाही.

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट सात वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

(IPL 2021 RCB Lost Playoff Match Against KKR Due To Dan Christian Over)

हे ही वाचा :

IPL 2021 : 7 वर्ष कॅप्टन, पण एकही ट्रॉफी नाही, कर्णधारपद सोडताना विराट भावूक, 5 मोठी वक्तव्य करत महत्त्वाची घोषणा

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.