IPL 2021 : RCB च्या नव्या खेळाडूंकडून विराटची निराशा, हसरंगा, टीम डेव्हिडला सूर सापडेना
आरसीबीने श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाला ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झँपाच्या जागी आणि सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टीम डेव्हिडला न्यूझीलंडच्या फिन एलनच्या जागी संघात स्थान दिले होते.
मुंबई : आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे संघासोबत येऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या संघाला त्यांचे बदली खेळाडू शोधावे लागले. आरसीबीने सर्वोत्तम खेळाडूंची टीम निवडली होती. पण असे दिसतेय की, त्यावर त्यांनी फारसे काम केलेले नाही. या कारणास्तव, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, विराट कोहलीने केवळ त्याच्या जुन्या सहकाऱ्यांवर विश्वास दर्शवला. त्याने नवी टीम निवडताना टीम डेव्हिड आणि वानिंदू हसरंगाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. त्यांच्या जागी कोहलीने काइल जेमिसन आणि डॅनियल क्रिश्चियन यांना संघात घेतले. या जुन्या टीमच्या परफॉर्मन्सवरच आरसीबीने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. (IPL 2021 : RCB new recruits Tim David and Wanindu Hasaranga fail to impress)
आरसीबीने श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाला ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झँपाच्या जागी आणि सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टीम डेव्हिडला न्यूझीलंडच्या फिन एलनच्या जागी संघात स्थान दिले होते. त्यानंतर त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी देण्यात आली. हसरंगाला दोन सामन्यांमध्ये संधी दिली, मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही आणि फलंदाजीची संधी मिळाल्यानंतरही तो एक धावा करू शकला. त्याने दोन सामन्यांमध्ये सहा षटके टाकली आणि 60 धावा दिल्या. म्हणजेच, 10 च्या इकोनॉमीने त्याने धावा दिल्या. त्याचवेळी, पहिल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. दुसऱ्या सामन्यात तो एका धावेवर नाबाद राहिला.
टीम डेव्हिड CSK विरुद्ध अपयशी
दुसऱ्या बाजूला टीम डेव्हिडला विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरवले. त्याला काइल जेमीसनच्या जागी आणण्यात आले. जेमीसन पूर्णपणे फिट नव्हता. पण आयपीएल पदार्पण सामन्यात डेव्हिड अपयशी ठरला. तीन चेंडूत एक धाव केल्यानंतर तो बाद झाला. अशा स्थितीत मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. हसरंगाने अलीकडेच भारताविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम खेळ दाखवला होता. मात्र आयपीएलमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही.
टीम डेव्हिड गेल्या काही काळापासून टी -20 क्रिकेटमध्ये चमकतोय, त्याने जगभरातील टी – 20 लीगमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग, कॅरिबियन प्रीमियर लीगचा समावेश आहे. आयपीएलमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
इतर बातम्या
आरसीबीच्या विजयात हर्षल पटेल चमकला, घेतली जबरदस्त हॅट्रीक, पाहा VIDEO
(IPL 2021 : RCB new recruits Tim David and Wanindu Hasaranga fail to impress)