Video : ‘बहुत तेज घुमाया ये तो….’ मॅक्सवेलचा षटकार पाहून रिषभ पंतलाही आश्चर्य, स्टम्पमागून हिंदी कॉमेन्ट्री!

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) स्टम्पमागून सतत काही ना काही बोलर्सला सूचना सांगत असतो किंवा अधून मधून कॉमेन्ट करत असतो.  (IPL 2021 RCB vs DC Rishabh Pant commentary behind the stumps and Comment on Glenn Maxwell Six )

Video : 'बहुत तेज घुमाया ये तो....' मॅक्सवेलचा षटकार पाहून रिषभ पंतलाही आश्चर्य, स्टम्पमागून हिंदी कॉमेन्ट्री!
'ये ते बहुत तेज घुमाया...', अशी कमेंट रिषभ पंतने स्टम्पमागून केली.
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 6:38 AM

अहमदाबाद :  दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) स्टम्पमागून सतत काही ना काही बोलर्सला सूचना सांगत असतो किंवा अधून मधून कॉमेन्ट करत असतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या बंगळुरुविरुद्धच्या (Royal Challengers banglore) सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. बंगळुरुचा स्टार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell दिल्लाचा बोलर अमित मिश्राला (Amit Mishra) उत्तुंग षटकार खेचला. यावेळी रिषभही आश्चर्यचकित झाला. ‘ये ते बहुत तेज घुमाया…’, अशी कमेंट त्याने यावेळी केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (IPL 2021 RCB vs DC Rishabh Pant commentary behind the stumps and Comment on Glenn Maxwell Six)

‘बहुत तेज घुमाया ये तो….’

बंगळुरुच्या डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये दिल्लीकडून अमित मिश्रा बोलिंगसाठी आला. याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने एक उत्तुंग षटकार ठोकला. हा सिक्स 85 मीटरचा होता. मॅक्सवेलने ज्या नजाकतीने हा सिक्स मारला ते पाहून रिषभ पंतही हैरान झाला. स्टम्पमागून रिषभ म्हणाला, ‘बहुत तेज घुमाया ये तो….’ रिषभच्या याच हिंदी कॉमेन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बंगळुरुचा दिल्लीवर केवळ 1 रन्सने विजय

बंगळुरु विरुद्ध दिल्ली या तुल्यबळ सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर अवघ्या एका रन्सने निसटता विजय मिळवला आहे. बँगलोरने दिल्लीला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दिल्लीला निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 14 रन्सची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने टिच्चून बोलिंग केली. त्याने यॉर्कर खूप नजाकतीने टाकले. तरीही पंतने त्याला दोन चौकार ठोकले. अखेर दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्सच करता आल्या. शेवटी बंगळुरुचा 1 रन्सने विजय झाला. यावेळी रिषभ पंत खूपच निराश झाला होता तर विराटला गगनात आनंद मावत नव्हता.

हेटमायरची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व्यर्थ

दिल्लीकडून शिमरन हेटमायरने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत या सामन्यातील दिल्लीचं आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवलं होतं. पण सामना न जिंकल्याने त्याची धडाकेबाज 53 रन्सची खेळी व्यर्थ गेली.

(IPL 2021 RCB vs DC Rishabh Pant commentary behind the stumps and Comment on Glenn Maxwell Six)

हे ही वाचा :

DC vs RCB IPL 2021 Match 22 Result : थरारक सामन्यात विराटसेनेचा दिल्लीवर अवघ्या 1 धावेने विजय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.