IPL 2021 : 7 वर्ष कॅप्टन, पण एकही ट्रॉफी नाही, कर्णधारपद सोडताना विराट भावूक, 5 मोठी वक्तव्य करत महत्त्वाची घोषणा

कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता.

IPL 2021 : 7 वर्ष कॅप्टन, पण एकही ट्रॉफी नाही, कर्णधारपद सोडताना विराट भावूक, 5 मोठी वक्तव्य करत महत्त्वाची घोषणा
विराट कोहली
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:36 AM

दुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले आहे. कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. इतक्या वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता फायनली तो दिवस आला, ज्या दिवशी कर्णधारपदाला अलविदा म्हणायचंय… हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त करताना यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्यावतीने 120 टक्के देईल, अशी ग्वाहीही दिली.

कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना

विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितलं.

सामन्यानंतर विराटची 5 मोठी वक्तव्य

सोमवारी झालेल्या प्लेऑफ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचं कोहलीनं आधीच जाहीर केलंय. विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात तरुण खेळाडू येऊन आक्रमक खेळ दाखवू शकतील. मी भारतीय संघासाठीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एवढेच म्हणेन की मी माझ्याकडून 120 टक्के संघाला दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून देत राहीन.

निष्ठा खूप महत्वाची

विराट कोहली म्हणाला, ‘आता पुढील तीन वर्षांसाठी नवीन संघ तयार होईल. मी RCB साठीच खेळेल.निष्ठा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या संघाशी माझा संबंध आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकेल. केकेआरच्या हातून झालेल्या पराभवाबाबत विराट कोहली म्हणाला, ‘त्यांच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये आमच्यावर वर्चस्व गाजवलं आणि विकेट घेत राहिले. आम्ही चांगली सुरुवात केली पण ती टिकवता आली नाही. आमच्या खराब फलंदाजीपेक्षा त्यांच्या चांगल्या गोलंदाजीबद्दल अधिक बोलायला हवे. कोहली म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पण आम्ही 15 धावांनी मागे पडलो. सुनील नरेनने आज दाखवले की तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वारंवार विकेट घेणाऱ्यांमध्ये का आहे. सुनील नरेन, शाकिब आणि वरुण या तिघांनीही शानदार गोलंदाजी केली आणि आमचे फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही.

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट सात वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

(IPL 2021 RCB vs KKR Virat kohli Lost Playoff match)

हे ही वाचा :

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.