RR vs CSK : जयसवालचं वादळ, दुबेची फटकेबाजी, राजस्थानचा चेन्नईवर दिमाखदार विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत

IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला.

RR vs CSK : जयसवालचं वादळ, दुबेची फटकेबाजी, राजस्थानचा चेन्नईवर दिमाखदार विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत
Yashasvi Jaiswal - Sanju Samson
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 11:39 PM

अबू धाबी : IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला. यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. (IPL 2021, RR vs CSK, Rajasthan Royals Defeated Chennai Super Kings by 7 wickets and 15 balls reamaining)

राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात वादळी सुरुवात केली. 5.2 षटकांमध्ये दोघांनी 77 धावांची सलामी दिली. लुईस 27 धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयसवालने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅससनने 28 धावांची खेळी केली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्याचा शिवम दुबेने चांगलाच फायदा उचलला, जयसवाल बाद झाल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने 42 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. दुबेने 4 चौकार आणि 4 षटकार फटकावले.

चेन्नईचा शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त उर्वरित सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. के. एम. आसिफने 2.1 षटकात 18 धावा देत एक बळी घेतला.

चेन्नईचा पहिला डाव

तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय चेन्नईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने 47 धावांची भागीदारी करत चेन्नईला चंगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडने राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई सुरुच ठेवली.

अखेरच्या काही षटकांमध्ये ऋतुराजला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 22 चेंडूत नाबात 55 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. रवींद्र जाडेजानेदेखील 15 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांमध्ये 189 धावांचा डोंगर उभा केला.

प्ले ऑफच्या आशा जिवंत

राजस्थानसाठी कोणत्याही परिस्थितीत आजच्या सामन्यात विजय आवश्यक होते आणि त्यांनी हा सामना एकहाती जिंकला. त्यामुळे राजस्थान संघ अजूनही प्ले ऑफ्सच्या शर्यतीत आहे. आजच्या सामन्यातील विजयासह राजस्थानने गुणतालिकेत 6 व्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रनरेटही मुंबई इंडियन्सपेक्षा सुधारला आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत.

इतर बातम्या

RR vs CSK : अबू धाबीत ऋतुराजचं वादळी शतक, राजस्थानची दाणादाण, 9 चौकार 5 षटकारांची आतषबाजी

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

विराट कोहलीनंतर भारताचं नेतृत्व कोणाकडे, डेल स्टेनचा ‘या’ चार खेळाडूंवर विश्वास

(IPL 2021, RR vs CSK, Rajasthan Royals Defeated Chennai Super Kings by 7 wickets and 15 balls reamaining)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.