IPL 2021 : संघातून वगळल्यानंतर रोहितचा शिलेदार फॉर्ममध्ये, कमबॅक सामन्यात ठोकलं धडाकेबाज अर्धशतक

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामध्ये पार पडला.

IPL 2021 : संघातून वगळल्यानंतर रोहितचा शिलेदार फॉर्ममध्ये, कमबॅक सामन्यात ठोकलं धडाकेबाज अर्धशतक
Mumbai Indians
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 10:38 AM

IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामध्ये पार पडला. प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकत मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. तसेच गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवं स्थान मिळवलं आहे. (IPL 2021 RR vs MI: Ishan Kishan’s half-century helps Mumbai Indians chase 90-run target in 8.2 overs)

सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.

किशनचं ‘कमबॅक’

विशेष म्हणजे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील इशान किशनचं हे पहिलंच अर्धशतक आहे. यंदा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच इशान किशन एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे मागील सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नव्हतं. तसेच क्रिकेट समीक्षकांनी त्याच्या टी-20 वर्ल्डकप संघातील समावेशावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली होती. कालच्या सामन्यात मुंबईने सलामीवीर आणि यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकला विश्रांती देत किशनला यष्टीरक्षक आणि सलामीवीर म्हणून संघात स्थान दिलं. या कमबॅक सामन्यात किशनने शानदार अर्धशतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे सूचित केले.

91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 षटकांत विजय मिळवून दिला. या खेळीत इशानने पहिले सहा चेंडू डॉट (निर्धाव) खेळले होते. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर किशनने पुढच्या 19 चेंडूत जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं.

राजस्थानची फलंदाजी ढासळली

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने त्यांचे यंदाच्या पर्वातील सर्वात खराब फलंदाजीचे दर्शन घडवले. संपूर्ण संघ मिळून 20 षटकात केवळ 90 धावाचं करु शकला. संघाकडून सर्वाधिक धावा म्हणजे सलामीवीर एविन लुईसने केलेल्या 24 धावा ठरल्या. तो बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार संजूही आज 3 धावा करुन बाद झाला. तर श्रेयस गोपाल, कुलदिप यादव हे तर शून्य धावांवर बाद झाले. लुईसशिवाय यशस्वी (12), मिलर (15) आणि तेवतिया (12) यांनी काही धावा केल्या. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नथान कुल्टर नाईलने 4, जेम्स नीशामने 3 आणि बुमराहने 2 विकेट्स घेतले.

चौथ्या स्थानासाठी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

इतर बातम्या

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(IPL 2021 RR vs MI: Ishan Kishan’s half-century helps Mumbai Indians chase 90-run target in 8.2 overs)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.