IPL 2022: वानखेडेसह अन्य स्टेडियम्सवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला कितपत फायदा मिळणार? क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात…

IPL 2022: इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धेच बहुचर्चित शेड्यूल अखेर जाहीर झालं आहे. कुठल्या संघाचा कोणा विरुद्ध किती तारखेला सामना होणार ते रविवारी जाहीर झालं.

IPL 2022: वानखेडेसह अन्य स्टेडियम्सवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला कितपत फायदा मिळणार? क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात...
मुंबई इंडियन्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 2:25 PM

IPL 2022: इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धेच बहुचर्चित शेड्यूल अखेर जाहीर झालं आहे. कुठल्या संघाचा कोणा विरुद्ध किती तारखेला सामना होणार ते रविवारी जाहीर झालं. आयपीएलचे मागचे दोन सीजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाल्यानंतर आता ही स्पर्धा भारतात होत आहे. मुंबई आणि पुण्यात लीग स्टेजचे सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या 26 मार्चला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (KKR) आयपीएलचा सलामीचा सामना होणार आहे. मागच्या सीजनमध्ये धोनीच्या संघाने केकेआरला नमवून आयपीएलमध्ये चौथे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये एकूण 10 संघ आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स असे दोन नवे संघ आहेत. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने होणार आहेत. 29 मे रोजी स्पर्धेची फायनल होईल. फक्त तीन शहरात स्पर्धेचे सर्व सामने होतील. कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊनच बीसीसीआयने तीन शहरापुरतीय आयपीएलचे हे सामने मर्यादीत ठेवले आहेत.

आयपीएलचे सर्व सामने मुंबई-पुण्यात होणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय.

कशी असेल मुंबईची रणनिती?

भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्यामते या सीजनमध्ये मुंबईच्या संघाला आपल्या रणनितीमध्ये फार बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही. अन्य फ्रेंचायजींनी मुंबई इंडियन्सला सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळायला मिळणार म्हणून आक्षेप घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम अन्य दोन स्टेडियमवरही खेळणार आहे, त्यानेही फार फरक पडणार नाही, असं आकाश चोप्रा यांना वाटतं. आकाश चोप्रा प्रसिद्ध कॉमेंटेटर आहेत. क्रिकेट एक्सपर्ट म्हणून त्यांच्या मताकडे पाहिलं जातं.

आक्षेपाला महत्त्व नाही

“आयपीएल सामने ज्या स्टेडियम्समध्ये होणार आहेत, तिथे सर्व संघांना एकसमान सामने खेळण्याची संधी देण्यात आली आहे. वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा एकही सामना खेळवू नये अशी मागणी झाल्याची बातमी होती. पण या आक्षेपाला फार महत्त्व दिलेलं नाही” असं आकाश चोप्रा म्हणाले.

मुंबई इंडियन्सवर परिणाम झाला नाही

“यावर्षी मेगा ऑक्शनच्यावेळी मुंबई इंडियन्स असा एकमेव संघ होता, ज्यांची वेगळी स्ट्रॅटजी दिसली नाही आणि पुढेही नसेल. मुंबई अशी एकमेव फ्रेंचायजी आहे, ज्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. मुंबई इंडियन्सचा संघ यावर्षी आणि पुढे सुद्धा मुंबईतच खेळणार आहे. त्यामुळे अन्य फ्रेंचायजींकडून आक्षेप होता” असे चोप्रा त्यांच्या युट्यूब चॅनलवर म्हणाले.

खेळपट्टी कशी असेल?

“तुम्ही वानखेडेवर खेळा, शेजारचं ब्रेबॉर्न असो किंवा डीवाय पाटील. या तिन्ही स्टेडियम्सच्या खेळपट्ट्यांमध्ये फार फरक नाहीय. काही एकसमान गोष्टी तुम्हाला आढळतील. तिन्ही स्टेडियम्सवर लाल मातीच्या पिचेस आहेत. एका संघाला थोडा फायदा होऊ शकतो” असे आकाश चोप्रा यांना वाटते.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.