IPL 2022 KKR vs PBKS: स्टेडियममधला ‘त्या’ दोघींचा लूक आणि अदांनी सोशल मीडिया घायाळ

IPL 2022 KKR vs PBKS: या लढतीत पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवला. एकवेळ या सामन्यात केकेआरची टीम बॅकफूटवर आहे, असं वाटलं होतं. पण आंद्रे रसेल या कॅरेबियन वादळाने सर्व चित्रच बदलून टाकलं.

IPL 2022 KKR vs PBKS:  स्टेडियममधला 'त्या' दोघींचा लूक आणि अदांनी सोशल मीडिया घायाळ
सुहाना खान-अनन्या पांडे Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 12:14 AM

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आज कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्समध्ये (KKR vs PBKS) आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील आठवा सामना झाला. कोलकाताने या लढतीत पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवला. एकवेळ या सामन्यात केकेआरची टीम बॅकफूटवर आहे, असं वाटलं होतं. पण आंद्रे रसेल या कॅरेबियन वादळाने सर्व चित्रच बदलून टाकलं. मैदानावर आल्यापासून त्याने लांब-लांब पर्यंत षटकार ठोकण्याचा धडाका लावला. रसेलच्या या वादळात पंजाब किंग्सची पार वाट लागली. नेमकी रसेलला गोलंदाजी कशी करायची? कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकायचा, अशी गोलंदाजांची अवस्था झाली होती. वानखेडे स्टेडियमवर आंद्रे रसेलचा पॉवर हिटिंगचा शो सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत काही खास पाहुणे उपस्थित होते. स्टेडियममधील कॅमेऱ्याची त्यांच्यावर नजर होती.

KKR मध्ये दोघांची पार्टनरशीप

आंद्रे-रसेलच्या बॅटमधून चौकार-षटकार निघाल्यानंतर हे खास पाहुणे सेलिब्रेशन करायचे आणि कॅमेरा लगेच त्यांच्याकडे वळायचे. हे खास पाहुणे म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या घरची मंडळी होती. कोलकाता नाइट रायडर्स हा शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या मालकीचा संघ आहे. दोघांची कोलकाता नाइट रायडर्समध्ये पार्टनरशिप आहे.

कॅमेरा त्यांच्याकडे वळला नसता तरच नवलं

आज कोलकाता आणि पंजाब किंग्सचा सामना पहायला शाहरुखची मुलगी सुहाना, मुलगा आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे व्हीआयपी गॅलरीमध्ये आले होते. अनन्याची आर्यन, सुहाना बरोबर खूप चांगली मैत्री आहे. सुहानाने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. त्यावर केकेआरचा लोगो स्पष्टपणे दिसत होता, तर अनन्या पांडे व्हाइट कलरचा टॉप घातला होता. दोघीचा ग्लॅमरस लूक पाहून कॅमेरा त्यांच्याकडे वळला नसता तरच नवलं.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

केकेआरच्या खेळाडूंनी विकेट काढल्यानंतर किंवा प्रत्येक चौकार-षटकाराच्यावेळी दोघी टीमचा उत्साह वाढवत होत्या. स्टारकिडस स्टेडियममध्ये आल्यानंतर सोशल मीडियावर लगेच त्यांचे फोटो व्हायरल झाले. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.