IPL 2022: ठरलं! हार्दिक पंड्या, राशिद खान, शुभमन गिल अहमदाबादकडून खेळणार, 37 कोटींमध्ये संघात समावेश
IPL 2022 साठी पुढील महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. याआधी, 2 नवीन संघांना त्यांच्यासोबत 3-3 खेळाडू जोडावे लागतील. दरम्यान, अहमदाबाद फ्रेंचायझींच्या (Ahmedabad franchises) खेळाडूंची यादी समोर आली आहे.
मुंबई : IPL 2022 साठी पुढील महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. याआधी, 2 नवीन संघांना त्यांच्यासोबत 3-3 खेळाडू जोडावे लागतील. दरम्यान, अहमदाबाद फ्रेंचायझींच्या (Ahmedabad franchises) खेळाडूंची यादी समोर आली आहे. हार्दिक पंड्या व्यतिरिक्त, संघाने आयपीएल 2021 मध्ये KKR आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या प्रत्येकी एक खेळाडूचा संघात समावेश केला आहे. पंड्याचा पगार 4 कोटींनी वाढला आहे. यावेळी टी-20 लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ उतरणार आहेत. अलीकडेच 8 जुन्या संघांनी 27 खेळाडूंना संघात कायम ठेवले होते. 22 जानेवारीपर्यंत नवीन संघांना खेळाडूंचा समावेश करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या व्यतिरिक्त अहमदाबादने शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान यांचा संघात समावेश केला आहे. गिल गेल्या मोसमात केकेआरकडून खेळला होता. मात्र, संघाने त्याला संघात कायम ठेवले नाही. त्याचवेळी राशिद बराच काळ सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र यावर्षी त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पंड्या आणि राशिद यांना प्रत्येकी 15 कोटी रुपये मिळणार आहेत. गेल्या मोसमात पंड्याला 11 तर राशिदला 9 कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पंड्याला 4 तर राशिदला 6 कोटींचा फायदा झाला आहे. याशिवाय गिलला आयपीएल 2021 मध्ये 1.8 कोटी रुपये मिळाले होती. अहमदाबादने त्याचा 7 कोटींमध्ये संघात समावेश केला आहे.
पंड्याला चमत्कार करावा लागेल
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्याची कामगिरी चांगली झालेली नाही. याच कारणामुळे मुंबई इंडियन्सने त्याला चालू मोसमात रिटेन केले नाही. आयपीएल 2021 मध्ये पंड्याने 11 डावात 127 धावा केल्या होत्या. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. तसेच त्याचा स्ट्राइक रेट 113 होता. पंड्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 147 डावात 2797 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकेही झळकावली आहेत. तर त्याचा स्ट्राइक रेट 142 इतका आहे.
नेहरा कोच आणि कर्स्टन मेंटॉर
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोळंकी हे फ्रेंचायझीचे संचालक आहेत. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना मेंटॉरची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच एक प्रकारे संघाने आपला कोअर ग्रुप जवळपास तयार केला आहे. संघ प्रथमच टी-20 लीगमध्ये प्रवेश करत आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे.
इतर बातम्या
Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…
IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार
(IPL 2022 Auction: Ahmedabad to give 15 Crore Each to Hardik Pandya, Rashid Khan, Shubman Gill Likley to be Third Pick)