IPL 2022 Auction Day 2: किती खेळाडूंवर बोली लागणार, लिलाव कधी सुरु होणार? जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे नियम

टाटा आयपीएल 2022 (Tata IPL 2022) च्या महा लिलावाचा (IPL 2022 Auction) पहिला दिवस जोरदार होता आणि सर्व 10 फ्रँचायझींनी अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. इशान किशन (Ishan Kishan) 15.25 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला, इतर संघांनी दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि आवेश खान या युवा भारतीय खेळाडूंमध्येही रस दाखवला.

IPL 2022 Auction Day 2: किती खेळाडूंवर बोली लागणार, लिलाव कधी सुरु होणार? जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे नियम
Tata Ipl Auction 2022
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:02 PM

मुंबई : टाटा आयपीएल 2022 (Tata IPL 2022) च्या महा लिलावाचा (IPL 2022 Auction) पहिला दिवस जोरदार होता आणि सर्व 10 फ्रँचायझींनी अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. इशान किशन (Ishan Kishan) 15.25 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला, इतर संघांनी दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि आवेश खान या युवा भारतीय खेळाडूंमध्येही रस दाखवला. अवेश खान (Avesh Khan) 10 कोटींच्या बोलीसह सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. पण ही फक्त पहिल्या दिवसाची झलक होती. महा लिलाव दोन दिवस चालणार आहे. रविवारी (आज) 13 फेब्रुवारी रोजी लिलावाचा दुसरा दिवस असून पुन्हा एकदा अनेक खेळाडूंचे नशीब बदलताना दिसणार आहे. आजही अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. मुंबई आणि हैदराबादच्या ताफ्यात खूम कमी खेळाडू आहेत आणि पर्समध्ये भरपूर पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे या दोन फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळेल.

इशान किशन कालच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इतिहासात प्रथमच एका खेळाडूसाठी 15.25 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. त्यानंतर दीपक चाहर, श्रेयस अय्यर, आवेश खान, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि निकोलस पूरन या खेळाडूंची 10 कोटीच्या घरात विक्री झाली. शिखर धवनला 8.25 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतलं. राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात घेतलं. 9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्जने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

लिलाव कधी सुरू होणार?

शनिवारप्रमाणेच रविवारीसुद्धा दुपारी 12 वाजता लिलाव सुरू होणार आहे. शनिवारी, मुख्य ऑक्शनर (लिलाव अधिकारी) ह्यू एडमिड्स यांनी लिलाव सुरू केला होता, परंतु लिलाव सुरु असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आणि अनुभवी क्रिकेट प्रेझेंटर चारू शर्मा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ह्यू आता ठीक आहेत आणि रविवारी तेच लिलावाचा कारभार पाहतील अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक संघाला 20-20 खेळाडूंच्या नावांची यादी लागणार

आज सर्व फ्रँचायझींना सकाळी 9 वाजेपर्यंत आयपीएलसमोर त्यांच्या पसंतीच्या 20-20 खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले होते. सर्व संघांनी ही यादी आयपीएल आयोजकांकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतर लिलावात या खेळाडूंचा समावेश केला जाईल. आज एक्सिलेरेटेड ऑक्शन पाहायला मिळेल. एक्सिलेरेटेड ऑक्शन म्हणजे खेळाडूंवर त्वरित बोली लावणे, ज्यामध्ये नाव समोर येताच काही सेकंदात निर्णय घ्यावा लागेल. तसेच आजच्या लिलाव प्रक्रियेत काल विकल्या न गेलेल्या खेळाडूंवरदेखील बोली लावली जाईल.

किती खेळाडूंवर बोली लागणार?

शनिवारी 1 ते 97 क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. रविवारी लिलाव सुरू होईल तेव्हा 98 ते 161 या क्रमांकाच्या खेळाडूंवर बोली लावली जाईल. त्यांचा लिलाव सामान्य पद्धतीने होईल. म्हणजेच संघांना विचार करण्यासाठी आणि बोली लावण्यासाठी थोडा वेळ दिला जाईल. शनिवारी लिलाव झाला होता अगदी तसाच लिलाव या खेळाडूंचा होईल. त्यानंतर 162 ते 600 क्रमांकाच्या खेळाडूंचा लिलाव हा एक्सिलेरेटेड ऑक्शन पद्धतीने होईल. यामध्ये त्या खेळाडूंचा समावेश असेल, ज्यांना फ्रँचायझींनी निवडून पाठवले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी विक्री न झालेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

कोट्यावधी गुंतवायचे, रिटर्न्स काय? IPLचं बिझनेस मॉडेल इतक्या सोप्या भाषेत कुणीही सांगणार नाही! वाचा

IPL 2022 Auction च्या पहिल्या दिवशी बोलर, विकेटकीपरवर पैशांचा पाऊस, टीम मॅनेंजमेंटकडून 350 कोटींची बरसात

IPL Auction 2022 : रग्गड कमाई करणाऱ्या आयपीएल खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात? टॅक्स किती बसतो?

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.